Sundara Manamadhe Bharli: सुंदरा मनामध्ये भरली (sundara manamadhe bharli)  या छोट्या पडद्यावरील मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेतील कलाकार आणि मालिकेच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेमध्ये अभिनेत्री अक्षया नाईक  (Akshaya Naik) आणि अभिनेता समीर परांजपे (Sameer Paranjape) हे कलाकार प्रमुख भूमिका साकारतात. अक्षया आणि समीर यांच्या मालिकेमधील केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले. या मालिकेतील कलाकार हे शूटिंग दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. नुकताच अक्षया नाईकनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षया ही ट्रक चालवताना दिसत आहे. 


अक्षया नाईकची पोस्ट


अक्षया नाईकनं सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमध्ये लतिका ही भूमिका साकारली आहे. नुकताच अक्षयानं एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, 'मी संपूर्ण टीमचे आभार मानते, नेहमीच काहितरी नवीन आणि challenging करायला मिळतं.' अक्षयाच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. 


अक्षयच्या पोस्टला नेटकऱ्यांच्या कमेंट्स 


अक्षयानं शेअर केलेल्या या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'सैराट-2 साठी आर्ची मिळाली रे...' तर अभिनेत्री ऋतुजा बागवेनं देखील अक्षयच्या या व्हिडीओला कमेंट्स केल्या.






अक्षयाच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती


अक्षयानं शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अक्षयानं शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अक्षया ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Vanita Kharat: 'थोडी स्वस्त कॉफी...'; महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातची पोस्ट चर्चेत