Sukh Mhanje Nakki Kay Asta: सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. या मालिकेतील जयदीप आणि गौरी यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तसेच मालिकेतील चिमुकली लक्ष्मी ही देखील प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. नुकताच या मालिकेच्या एपिसोडचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये जयदीप हा लक्ष्मीवर चिडलेला दिसत आहे. 


काही दिवसांपूर्वी मंगलची जेलमधून सुटका झाली. मंगल ही जवळपास 30 वर्ष तुरुंगात होती. तुरुंगातून सुटका होताच मंगल ही शिर्केपाटील कुटुंबाच्या घरात आली. आता मंगल ही लक्ष्मीला वाईट शब्द बोलायला शिकवत आहे, असं दिसतंय. कारण मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये लक्ष्मी जेव्हा वाईट शब्द बोलते तेव्हा जयदीप तिला विचारतो की, 'हे तुला कोणी शिकवलं?' तेव्हा लक्ष्मी म्हणते 'मंगल आजीनं' त्यामुळे आता लक्ष्मीवर चुकीचे संस्कार होऊ नयेत म्हणून जयदीप काय पाऊल उचलेल? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागेल आहे. 


 लक्ष्मी ही बोलताना वाईट शब्द वापरते तेव्हा शिर्केपाटील कुटुंब हे आश्चर्यचकित झालेलं दिसत आहे. लक्ष्मीच्या तोंडून वाईट शब्द ऐकताच जयदीप चिडतो. जेव्हा लक्ष्मी ही मंगलचं नाव घेते तेव्हा मंगल ही हसताना दिसत आहेत. आता लक्ष्मीवर चुकीचे संस्कार होऊ नयेत म्हणून जयदीप काय  पाऊल उचलेल?  या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये मिळेल.


पाहा प्रोमो: 






सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक या मंगल ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. तसेच या मालिकेत गिरिजा प्रभू, मंदार जाधव, माधवी निमकर आणि वर्षा उसगावकर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहेत. या मालिकेतील गौरी ही भूमिका अभिनेत्री गिरिजा प्रभू ही साकारते तर जयदीप ही भूमिका  अभिनेता मंदार जाधव हा साकारतो. मालिकेच्या कथानक देखील प्रेक्षकांची मनं जिंकते. प्रेक्षक या मालिकेच्या आगामी एपिसोडची उत्सुकतेने वाट बघत असतात. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


'आम्ही कुटुंबियांसोबत ही सीरिअल बघतो, हे असे सीन्स...' ;'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील रोमँटिक सीन पाहिल्यानंतर भडकले नेटकरी