Srimad Ramayan: विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात.  रामायणावर आधारित अनेक शो टीव्हीवर प्रसारित झाले आहेत. आता ‘श्रीमद् रामायण’ (Srimad Ramayan) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. 


'श्रीमद् रामायण' या आगामी  मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेद्वारे भगवान राम यांची  कथा पुन्हा प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे. मेकर्सनी मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोनं अनेक नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 


नेटकऱ्यांच्या कमेंट्स


'श्रीमद् रामायण' या आगामी  मालिकेच्या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'श्रीमद् रामायण या मालिकेबद्दल कळल्यानंतर मला आनंद झाला आहे, कृपया ही मालिका लवकर रिलीज करा.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'जय श्री राम, आम्ही या मालिकेची वाट बघत आहोत.'


पाहा प्रोमो:






'श्रीमद् रामायण' मालिका कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीस?


स्वस्तिक प्रॉडक्शनने श्रीमद् रामायण या मालिकेची निर्मिती केली असून पुढील वर्षी जानेवारी 2024 पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिद्धार्थ कुमार तिवारी यांच्या स्वस्तिक प्रॉडक्शनने या मालिकेची निर्मिती केली आहे. सिद्धार्थ हे महाभारत, सूर्यपुत्र कर्ण, कर्मफल दाता शनी  , पोरस, राम सिया के लव कुश आणि  राधा कृष्ण  यासह अनेक लोकप्रिय पौराणिक मालिकांचे निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. आता त्यांच्या 'श्रीमद् रामायण' या मालिकेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 'श्रीमद् रामायण' या मालिकेत कोणते कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.  


 1987 मध्ये रामायण ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. आता श्रीमद् रामायण ही मालिका पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Yashoda - Goshta Shyamchya Aaichi: 'यशोदा गोष्ट श्यामच्या आईची' मालिकेचा शेवटचा एपिसोड येणार प्रेक्षकांच्या भेटीस; वीरेंद्र प्रधान पोस्ट शेअर करत म्हणाले, 'टीआरपी नाही हे कारण...'