Spruha Joshi In Marathi Serial :   मागील काही दिवसांपासून छोट्या पडद्यावर नवीन मालिकांचा रतीब सुरू झाला आहे. टीआरपीच्या स्पर्धेत कायम राहण्यासाठी आघाडीच्या वाहिन्यांनी नव्या मालिका सुरू केल्या आहेत. टीआरपीच्या यादीत मागे पडलेल्या कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीने आता कंबर कसली आहे. कलर्स मराठीने आपल्या दुसऱ्या नव्या मालिकेची घोषणा केली आहे. 'सुख कळले' (Sukh Kalale) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत स्पृहा जोशी (Spruha Joshi) आणि सागर देशमुख (Sagar Deshmukh) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  अभिनेता सागर देशमुख ही या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. तर, स्पृहा जोशी जवळपास वर्षभरात पुन्हा मालिकेत झळकणार आहे. सागर देशमुखने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाची गौरवगाथा' या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी त्यांनी साकारलेल्या भूमिकेला दाद दिली होती. 


'कलर्स मराठी' वाहिनीने आपल्या नव्या मालिकेचा प्रोमो लाँच केला. 'सुख कळले' ही मालिका कौटुंबिक धाटणीची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सागर देशमुख, स्पृहा जोशीसोबत मिमी खडसे ही बालकलाकारदेखील झळकणार आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोवर प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या मालिकेच्या माध्यमातून स्पृहा जोशी जवळपास वर्षभरानंतर मालिकेत भूमिका साकारताना दिसणार आहे. या दरम्यानच्या काळात तिने काही रिएलिटी शोचे सूत्रसंचालन केले होते. त्यानंतर ती मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 






'इंद्रायणी' मालिका प्रेक्षकांच्या भेटीला...






दरम्यान, कलर्स मराठी वाहिनीवर इंद्रायणी ही नवी मालिका सुरू होणार आहे. येत्या 25 मार्चपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सायंकाळी 7 वाजता ही मालिका प्रसारीत होणार आहे. मालिकेत संदीप पाठक, अनिता दाते यांच्यासह सांची भोईर या बालकलाकाराची मुख्य भूमिका आहे. 


इतर महत्त्वाची बातमी :