Lock Upp Update : बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्या 'लॉक अप' (Lock Upp) या शोची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. अनेकदा हा शो वादात देखील अडकतो. आता या शोबद्दल एक नवी अपडेट समोर आली आहे. कंगना रनौतच्या 'लॉक अप' शोमध्ये लवकरच एक नवीन स्पर्धक तुरुंगात जाणार आहे. आता हा स्पर्धक दुसरा कोणी नसून, स्पर्धक-अभिनेत्री सारा खानचा (Sara Khan) माजी पती अली मर्चंट (Ali Merchant) आहे. अली या शोमध्ये प्रवेश करताच या शोची मजा आणखी वाढणार असल्याची प्रतिक्रिया कंगनाने दिली आहे.

Continues below advertisement


शोमध्ये अलीच्या एंट्रीची बातमी स्वतः निर्मात्यांनी इंस्टाग्रामवर प्रोमोद्वारे शेअर केली आहे. ALTBalaji ने शेअर केलेल्या या प्रोमोवरून अली हा शोचा 14वा स्पर्धक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अलीनेही हा प्रोमो त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.



असा शो ज्यामध्ये मी असलोच पाहिजे!


या शोमध्ये सारासोबत स्क्रीन शेअर करण्याबद्दल बोलताना अलीने एका मुलाखतीत सांगितले की, ‘मला वाटते की हा एक शो आहे, जिथे मी असलोच पाहिजे. मला माहित आहे की, सारा देखील येथे आहे. ती इंडस्ट्रीत स्वत:ला पुन्हा स्थापित करण्यासाठी आली आहे. मला आशा आहे, तिचा यावर विश्वास असेल की, ती लवकरच पुनरागमन करेल.’


अलीने शोमध्ये येण्याची इच्छा व्यक्ती केली!


काही दिवसापूर्वी अली मर्चंटने कंगनाने शोमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली होती. ‘मला या शोची ऑफर मिळाली असती, तर मी या शोमध्ये नक्की जाईन’, असं तो म्हणाला होता. आता निर्मात्यांनी त्याची इच्छा पूर्ण केल्याचे दिसते.  


‘बिग बॉस’मध्ये पार पडला होता लग्नसोहळा!


सारा खान आणि अली मर्चंट सलमान खानच्या शो ‘बिग बॉस 4’चा भाग बनले होते. या शोमध्येच दोघांनी लग्न केले होते. शो संपल्यानंतर काही वेळातच दोघे वेगळे झाले. अलीने सांगितले की, सारा बिग बॉसमध्ये सहभागी झाली होती, तेव्हा ती अली मर्चंटसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण, शोमध्ये गेल्यानंतर स्पर्धक अस्मित पटेलसोबत तिची जवळीक वाढू लागली. त्यानंतर अलीने शोमध्ये प्रवेश केला आणि त्याने सारासोबत लग्न केले होते.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha