Shark Tank India 3 : 'शार्क टॅंक इंडिया 3' लवकरच होणार सुरू; प्रोमो आऊट!

Shark Tank India : 'शार्क टॅंक इंडिया'चं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Continues below advertisement

Shark Tank India Season 3 : 'शार्क टॅंक इंडिया' (Shark Tank India) या कार्यक्रमाच्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. आता या कार्यक्रमाचं नवं प्रर्व अर्थात 'शार्क टॅंक इंडिया 3' (Shark Tank India 3) प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. देशभरातील उद्योगकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं स्वप्न साकार होण्यासाठी मदत होणार आहे. 

Continues below advertisement

'शार्क टॅंक इंडिया 3'चा प्रोमो आऊट! (Shark Tank India Season 3 Promo Out)

'शार्क टॅंक इंडिया 3'चा प्रोमो आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'शार्क टॅंक इंडिया 3'च्या प्रोमोच्या सुरुवातीला एका व्यावसायिक 'बिझनेसमन टायकून ऑफ द इयर' या पुरस्काराचा स्वीकार करताना दिसत आहे. पुरस्कार स्विकारताना ते म्हणत आहेत,"मी घरातून बाहेर पडलो तेव्हा माझ्या शर्टाच्या खिशात दहा रुपायाची फाटलेली नोट होती. वडिलांच्या बॅंक खात्यात 50 लाख रुपये होते. माझ्या काकांनी मला दिलेल्या 10 कोटींच्या सरकारी कंत्राटावर मी जगलो आहे. अनेक अडचणींचा सामना करत इथपर्यंत पोहोचलो आहे.

'शार्क टॅंक इंडिया 3'च्या  रजिस्ट्रेशनला सुरुवात

'शार्क टॅंक इंडिया 3'साठीचं रजिस्ट्रेशन सोनी लिव्हवरच करता येणार आहे. 'शार्क टँक इंडिया सीझन 3'चा नोंदणी अर्ज भरण्यासाठी सोनीलिव्ह अॅप डाउनलोड करा किंवा Sonyliv.com वर लॉग ऑन करा. तुमच्या व्यवसाय कल्पनेचे तिथे तुम्हाला वर्णन करावं लागणार आहे. तुमची कल्पना ‘शार्क टँक इंडिया टीम’चे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली.

कथाबाह्य कार्यक्रमांमध्ये 'शार्क टॅंक इंडिया 3'चा समावेश आहे. ज्या लोकांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे आणि या रिअॅलिटी शोमध्ये ते ज्या कल्पनेने आले आहेत. हे जाणून घेणारा हा शो आहे. तसेच स्पर्धकांच्या वेगवेगळ्या संकल्पना या शो मध्ये परिक्षकांना ऐकवल्या जातात. त्यानंतर परिक्षकांना एखाद्या स्पर्धकाची कल्पना आवडल्यास ते त्या स्पर्धकाला आर्थिक पाठबळही देतात. एकंदरी अशा पठडीचा हा रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या फारंच पसंतीय पडतोय. आतापर्यंतच्या रिअॅलिटी शो मधला हा पहिला भारतीय बिझनेस रिअॅनिटी शो आहे. जो अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचला आहे. 

संबंधित बातम्या

Anupam Mittal Father Death: शार्क टँक फेम अनुपम मित्तल यांना पितृशोक; गोपाल कृष्ण मित्तल यांचे निधन

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola