Rajeshwari Kharat : फँड्री फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. ती आपल्या चाहत्यांसाठी नेहमी काहीना काही शेअर करत असते. आता तिने (Rajeshwari Kharat) बॉलिवूडचा किंगखान शाहरुखसोबत एक सेल्फी केलाय. या सेल्फीला तिने (Rajeshwari Kharat) "@iamsrk

" अशा आशयाचं कॅप्शन दिलं आहे. राजेश्वरीच्या या सेल्फीवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. मात्र, काही नेटकऱ्यांनी हा फोटो AI द्वारे बनवण्यात आल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे हा फोटो खरा आहे की  AI ने बनवलेला आहे? असा सवाल उपस्थित केला जातोय. 

राजेश्वरी खरातचं धर्मावरुन ट्रोलिंग सुरु 

अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने काही महिन्यांपूर्वी ख्रिश्चन धर्मातील बाप्तिस्मा हा विधी पूर्ण केला होता. हा विधी पूर्ण करतानाचा एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यानंतर संपूर्ण सोशल मीडियावर राजेश्वरी खरात ख्रिश्चन असल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर गेल्या काही महिन्यात राजेश्वरी खरातला विनाकारण ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे अनेक नेटकरी तिचं धर्मावरुन ट्रोलिंग करत आहेत.

राजेश्वरीच्या अभिनय कारकिर्दीला खरी चालना मिळाली ती "फँड्री" या नागराज मंजुळे दिग्दर्शित चित्रपटातून. या चित्रपटात तिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती. 'फँड्री'मध्ये तीने साकारलेली शांत, अबोल आणि देखणी शाळकरी मुलगी ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. हा चित्रपट जातीव्यवस्थेवर आधारित असून त्यात तिची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. तिच्या सौंदर्याने आणि सहज अभिनयाने ती लगेचच चर्चेत आली.

"फँड्री"नंतर राजेश्वरीने काही काळ शिक्षणाकडे लक्ष दिलं. मात्र, सोशल मीडियावर तिचा फोटोशूट, व्हिडीओज, यामुळे ती कायम चर्चेत राहिली. तिचं सौंदर्य, लूक आणि स्टाईल यामुळे ती अनेक तरुणांच्या गळ्यातली ताईत बनली.तिने काही म्युझिक अल्बम्स, लघुपट (शॉर्ट फिल्म्स) आणि वेबसीरिजमध्येही काम केलं. त्यातील काही प्रोजेक्ट्सना चांगला प्रतिसाद मिळाला. तिची अभिनयक्षमता, डोळ्यांतली भाषा आणि साधेपणा हे तिचे विशेष गुण मानले जातात.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

लिंग बदलाची शस्त्रक्रिया केल्यानंतर किती दिवसांनी पार्टनरसोबत रिलेशन ठेवता येतं? बॉबी डार्लिंगने सांगितली माहिती VIDEO

'बड्या कलाकाराने मणिरत्नमचा सिनेमा निवडला अन्..', वास्तवमधील दीडफुट्याच्या भूमिकेबाबत संजय नार्वेकरांचा मोठा खुलासा