Shark Tank India : सध्या सोनी टीव्हीवर 'शार्क टँक इंडिया' (Shark Tank india) नावाचा शो सुरू आहे. जज म्हणून काही यशस्वी व्यावसायिक या मंचावर दिसत आहेत, ज्यांना 'शार्क' म्हटले जातेय. या शोचा उद्देश स्पर्धकांना किंवा व्यवसायाच्या कल्पना घेऊन आलेल्या नवीन उद्योजकांना एक नवीन सुरुवात करून देणे हा आहे. भारतात आशा शो पहिल्यांदाच घडत आहे. चला जाणून घेऊया या शोच्या परीक्षकांबद्दल, कोण आहेत हे लोक जे केवळ एका आयडियावर पैशांचा पाऊस पाडत आहेत..
अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover)
शार्क टँक इंडियाच्या परीक्षकांच्या यादीत पहिले नाव आहे अश्नीर ग्रोव्हर. अश्नीर हे फिनटेक फर्म ‘भारतपे’चे सह-संस्थापक आणि एमडी आहेत. त्यांनी आयआयटी दिल्ली आणि आयआयएम अहमदाबादमधून शिक्षण घेतले आहे. अश्नीर यांची एकूण संपत्ती 700 कोटी आहे. सध्या अश्नीर ग्रोव्हर स्वतः वादात अडकले आहेत आणि दरम्यान त्यांनी या शोमधून दीर्घ रजा घेतली आहे.
पियुष बन्सल (Peyush Bansal)
पियुष बन्सल हे 'लेन्सकार्ट’चे सीईओ आणि संस्थापक आहेत. सप्टेंबर 2019 पर्यंत, लेन्सकार्टचे भारतातील 70हून अधिक शहरांमध्ये स्टोअर्स होते. पियुष बन्सल यांची एकूण संपत्ती 600 कोटी इतकी आहे. या कंपनीची स्थापना 2010मध्ये झाली होती.
नमिता थापर (Namita Thapar)
नमिता थापर या एमक्यूर फार्मास्युटिकल या जागतिक औषध कंपनीच्या सीईओ आहेत. त्यांनी अमेरिकेमधील अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे, तसेच व्यावसायिक जगतात अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 600 कोटी आहे.
विनिता सिंग (Vineeta Singh)
विनिता सिंग या SUGAR कॉस्मेटिक्सच्या सीईओ आणि सह-संस्थापक आहेत. त्यांनी आयआयटी आणि आयआयएममधून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांना एक कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले. पण, त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि देशातील टॉप व्यावसायिक महिलांपैकी एक बनल्या. विनिता सिंग यांची एकूण संपत्ती 59 कोटी रुपये आहे.
अनुपम मित्तल (Anupam Mittal)
अनुपम मित्तल हे 'PeopleGroup-Shaadi.com'चे संस्थापक आणि सीईओ आहेत. अनुपम मित्तल हे आता भारतातील ई-कॉमर्स उद्योगातील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक बनले आहेत. ते रिअॅलिटी टीव्ही शो शार्क टँक्स इंडियाचे न्यायाधीश आहेत. अनुपम यांनी बोस्टन कॉलेज, यूएसएमधून आपले शिक्षण पूर्ण केले. अनुपम यांची एकूण संपत्ती 186 कोटी आहे.
हेही वाचा :
- रुको जरा, सबर करो डायलॉगने प्रसिद्ध, कोण आहे हिंदुस्थानी भाऊ?
- Bigg Boss 15 : तेजस्वीच्या विजयावर नेटकऱ्यांची नाराजी, प्रेक्षकांसाठी Pratik Sehajpal खरा विजेता
- Pushpa Box Office Collection : अल्लू अर्जुनने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, मोडले प्रभासच्या 'बाहुबली'चे रेकॉर्ड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha