Abhishek Gaonkar On Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या मालिकेत अभिषेक गावकर (Abhishek Gaonkar) महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे.


'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेबद्दल आणि भूमिकेबद्दल बोलताना अभिषेक गावकर म्हणाला,"मी आधी बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे . 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेत मला एक महत्वाची भूमिका साकारायला मिळतेय. ह्या मालिकेत एक कुटुंब दाखवलं आहे आणि त्या कुटुंबाचा मी पण एक महत्वाचा भाग आहे. मला असं वाटतं की  मालिकेत जे कुटुंब दाखवले आहे प्रेक्षकांना ते आपलंच कुटुंब वाटत असेल, कारण या खोत कुटुंबात खूप साधेपणा आहे. या मालिकेत प्रत्येक पात्राच्या काही भूमिका आणि तत्व आहेत जी प्रत्येक कुटुंबात असतातच. हीच गोष्ट मला जास्त आवडली. माझ्या भूमिकेचं नाव आहे 'श्रीनिवास सावंत' आणि मला प्रेमाने सगळे ‘श्रीनू’ म्हणतात".


अभिषेक पुढे म्हणाला,"दादा मामा म्हणजेच रघुनाथ राव (अशोक शिंदे) हे श्रीनूसाठी आदर्श आहेत. कारण त्याला त्यांचा खूप आदर आहे. रघुनाथ रावांचे तत्व व विचार श्रीनूला आपलेसे वाटतात आणि तो तसाच वागतो. दादामामा आणि श्रीनू मध्ये फरक एवढाच आहे की, श्रीनू खुप बोलका आहे आणि घरात प्रत्येकाची बाजू काय आहे हे श्रीनिवासला माहिती आहे. या भूमिकेसाठी मी तयारी पण खूप छान केली होती. ही पहिली मालिका अशी आहे ज्यात माझा लव्ह अँगल पण दाखवला आहे, ह्या आधीच्या मालिकांमध्ये बरेच नेगेटिव्ह आणि व्हिलन शेड्स होत्या".


'या' कारणाने दिला मालिकेला होकार


'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेचं कथानक ऐकून लगेचच मी मालिकेला होकार दिला. मालवणमध्ये या मालिकेचं शूटिंग होत आहे. मी कणकवलीचा असल्यामुळे माझ्यासाठी तो प्लस पॉईंट होता. पण सगळ्याच लोकांना मालवणी भाषा कळेलच असं नाही म्हणून या मालिकेत काही लोकांचे डायलॉग मालवणीत केले आहेत आणि काही मराठीत. 'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका कोकणातली कथा असून माझ्या मनात हा प्रोजेक्ट करायची खूप इच्छा होती व ती पूर्ण झाली.  मी वाट बघत होतो केव्हा चित्रीकरण सुरू होईल कारण कमाल कथानक, उत्तम संवाद तसेच सहकलाकार ह्या सर्व गोष्टीं मूळे आमचा हा प्रवास खूप छान सुरू आहे". 


सहकलाकारांबद्दल बोलताना अभिषेक म्हणाला," आम्हाला एकत्र आता काम करून आता 1-2 महिने झालेत. सगळ्यांसोबत एक छान नातं जुळलं आहे. मी, ओवी, निशी आणि डुग्गू आम्ही यंग ब्रिगेड सेट वर खूप मजा मस्ती करतो. अशोकजींची भूमिका खूप शांत आहे पण ऑफ स्क्रीन ते खूप बोलके आहेत ते सगळ्यांना बांधून ठेवतात आणि प्रेरणा देतात".


एकांकिका स्पर्धा ते मालिका... जाणून घ्या अभिषेकच्या प्रवासादबद्दल


अभिनयक्षेत्रातील प्रवासाबद्दल बोलताना अभिषेक म्हणाला,"मी महर्षी दयानंद कॉलेजमध्ये ग्रॅजुएशन केलं आहे. कॉलेजमध्ये असताना अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला, मी स्टोरी रायटिंग पण केलं आहे आणि याच मुळे मी काही मालिकांच्या लेखकांना असिस्ट पण केलं आहे. मी बऱ्याच नाटकात काम केलं असून आतापर्यन्त पाच सिरीयल केल्या आहेत. आता पर्यंतचा प्रवास खूप सुरस राहिला आहे आणि या पुढे ही अगदी खात्रीने मी सर्वतोपरी मी उत्तम काम करेन".


संबंधित बातम्या


Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' चा पहिला एपिसोड कसा वाटला? नेटकरी म्हणतात...