Sandeep Khare :  अभिनेत्री रुमानी खरे (Roomani Khare) हिची नवी मालिका दुर्गा ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अंबर गणपुले आणि रुमानी हे मुख्य भूमिकेत आहेत. नुकतच या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आलाय. यानंतर रुमानीचे वडील आणि गीतकार, संगीतकार संदीप खरे (Sandeep Khare) यांची पोस्ट सध्या चर्चेत आलीये. 


रुमानी खरे ही संदीप खरे यांची लेक आहे. रुमानी ही झी मराठी वाहिनीवरील तु तेव्हा तशी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर मुख्य भूमिकेतील रुमानीची ही दुसरी मालिका आहे. त्यामुळे तिच्या या नव्या मालिकेची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. 


बापाची लेकीसाठी कौतुकाची पोस्ट


संदीप खरे यांनी पोस्ट करत म्हटलं की, 'लाडक्या लेकीची दुसरी मालिका. प्रमुख भूमिका असलेली...अगदी तिच्या भूमिकेचंच नाव मालिकेला दिलेलं.'कसं वाटतंय ' हा अत्यंत nonsense प्रश्न अनेकदा खूप चुकीच्या वेळी विचारला जातो. मला आत्ता कोणी विचारला तर मला odd नाही वाटणार पण खरं सांगू... शब्दात सांगता येणंही खरंच नाही जमणार !'


पुढे त्यांनी म्हटलं की, 'अगदी परवापर्यंत तर एवढीशी होती आणि आता मारे shooting, प्रवास, उलट सुलट schedules सगळं सांभाळत आम्हालाच सांगत असते की ' chill, बाबा!" आणि मग जेव्हा घरी येते तेव्हा सगळं बाजूला ठेवून तशीच धमाल पण करते ! आम्ही आई बाबा... लेकीचं कौतुक वाटणारच.... पण तिच्या पहिल्या ' तू तेव्हा तशी ' या मालिकेपासून आत्ताच्या या प्रोमो पर्यंत साऱ्यांचंच उदंड प्रेम, आशीर्वाद तिला लाभतायत !'


'योगायोग फारच मजेशीर आहे !'


'या दुसऱ्या मालिकेलाही तुमचे आशीर्वाद, कौतुक तिला लाभेल असा विश्वास आहे ! एक गंम्मत मात्र वाटते....तिच्या शांत, शहाण्या, समंजस स्वभावाला ' दुर्गा ' नाव असलेली भूमिका मिळावी हा योगायोग फारच मजेशीर आहे ! मालिका जरूर पहा... तुमचे अभिप्राय महत्वाचे आहेत !' असं म्हणत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.   






ही बातमी वाचा : 


Soniya Parchure: 'सगळं केलं पण बायको म्हणून त्याच्या यातना...'; सोनिया परचुरेंनी सांगितला अतुल परचुरेंच्या आजारपणातील खडतर प्रवास