Soniya Parchure: अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांना काही महिन्यांपूर्वी कर्करोगासारख्या गंभीर आजारानं ग्रासलं होतं. पण जसा रंगभूमीवर एखादा नट कितीही संकटं आली तरी प्रेक्षकांच्या मनोरंजनामध्ये खंड पडू न देता त्याच्या अभिनयावरील विश्वास कायम ठेवतो, त्याचप्रमाणे अतुल परचुरे यांनी त्यांच्या जगण्यावरचा विश्वास कायम ठेवला. त्यामुळे रंगभूमीवरच्या या नटानं या आजारावरही जिद्दीनं मात दिली. या सगळ्यात त्यांच्या पत्नी सोनिया परचुरे (Atul Parchure) त्यांच्यासोबत खंबीरपणे त्यांच्यासोबत होत्या. 


सोनिया परचुरे यांनी नुकतीच आरपार ऑनलाईनला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अतुल परचुरे यांचा कर्करोगाशी झुंजतानाचा खडतर प्रवास कसा होता, याविषयी त्या व्यक्त झाल्या आहेत. त्याचप्रमाणे अतुलच्या जगण्याच्या इच्छेने मला लढण्याच बळ दिलं असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे. 


'एखादा आजार तुम्हाला असाह्य करुन जातो'


सोनिया परचुरे यांनी म्हटलं की, अतुल हा माझ्यासाठी पहिल्यापासूनच हिरो होता. त्यामुळे मला माझ्यापेक्षाही अतुल ज्या परिस्थितीमध्ये डॉक्टरांकचं शांतपणे ऐकायचा ते पाहून जास्त वाईट वाटलं. कारण तुम्ही काहीतरी म्हणालात आणि अतुलने ते शांतपणे ऐकून घेतलं, असं कधीच होत नाही. एखादा आजार तुम्हाला किती असाह्य करुन जातो, हे मला तेव्हा कळालं. पहिल्या सहा महिन्यांत खूप दऱ्या आल्या. पण त्यावेळी ती ताकद आपल्याला मिळते की, हे आपण पार करु शकू. अतुलला मात्र खूप विश्वास होता, की मी ह्यातून बाहेर पडेनच. या काळात ताकद ही देवानेच दिली. 


'बायको म्हणून...'


पुढे त्यांनी म्हटलं की, 'एका टप्प्यावर अतुलचा आवाज गेला. मी डॉक्टरांना म्हटलं की, अहो अतुलचा आवाज गेला. त्याचा आवाज जाऊन नाही चालणार. आपण किती बायको वैगरे सगळं असलो तरीही त्या व्यक्तीला ज्या यातना होत असतात त्यातून त्याला आपण नाही बाहेर काढू शकत. आपण त्यावेळी हतबल होतो.'  






ही बातमी वाचा : 


Raj Thackeray Biopic : लाव रे तो व्हिडीओ... मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आयुष्यावरील बायोपिकची पहिली झलक