Sa Re Ga Ma Pa Winner 2022 : 'सा रे ग म प' शोचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला असून शोला विजेता मिळाला आहे. पश्चिम बंगालची निलांजना राय (Neelanjana Ray) 'सा रे ग म प'च्या यंदाच्या पर्वाची विजेती ठरली आहे. 19 वर्षीय निलांजना रायला ट्रॉफी आणि 10 लाख बक्षीसाच्या रकमेसह सन्मानित करण्यात आले आहे. शोमध्ये राजश्री बाग (Rajashri Bag) फर्स्ट रनर अप आणि शरद शर्मा (Sharad Sharma) सेकंड रनर अप ठरले. युवा गायिका निलांजनाने आपल्या प्रवासाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 


सा रे ग म प जिंकल्यानंतर निलांजना रायने प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, 'ही ट्रॉफी स्वीकारताना मला खूप आनंद होत आहे. पण माझ्यासाठी प्रेक्षकांची मने जिंकणे आणि त्यांचे प्रेम मिळवणे हेच मुख्य ध्येय होते. प्रेक्षकांकडून भरभरून मिळालेले प्रेम हे ट्रॉफीप्रमाणेच आहे. ही ट्रॉफी त्यामध्ये बोनस आहे. मी सा रे ग म प जिंकणे हे माझ्या पालकांचे नेहमीच स्वप्न होते, ते आज पूर्ण झाले.' 



निलांजना पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार या छोट्याशा शहरातील आहे. निलांजनाचे आई-वडील आपल्या मुलीच्या विजयाबद्दल खूप उत्साहित आहेत. निलांजनाच्या पालकांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, निलांजना सध्या खूप आनंदी आहे आणि तिचा आनंद आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. प्रत्येक पालकांच्या शुभेच्छा कायम त्यांच्या मुलांच्या पाठिशी असतात.'


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha