Rupali Bhosle : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रूपाली भोसलेच्या (Rupali Bhosle) अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. रूपालीला आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत  संजना ही भूमिका रूपाली साकारते. नुकताच रूपालीनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये रूपालीच्या पायाला दुखापत झालेली दिसत आहे. एका मुलाखतीमध्ये रूपालीनं या दुखापतीबाबत सांगितलं. 


एका इंग्रजी वृत्त पत्राला दिलेल्या मुलाखतीत रूपालीनं सांगितलं,'मी आई कुठे काय करते मालिकेचा एका सीन शूट करत होते. या सीनमध्ये अभिनेते मिलिंद गवळी देखील माझ्यासोबत होते. सीन असा होता की, अनिरूद्ध हा संजनाला घटस्फोट देण्याचा विचार करतो. हे लक्षात येताच संजना ओरडते आणि खुर्चीवर बसते. मला वाटलं की खुर्ची ऐवजी जमिनीवर बसायचे आहे. त्यामुळे मी ओरडले आणि खाली बसले. खाली बसताना माझ्या पायाचं बोट फोल्ड झालं आणि अंगठ्याचं नख तुटल्या. नख तुटल्यानं रक्त येत होतं. शूटिंग सुरू असलेल्या सेटच्या आजूबाजूला डॉक्टर देखील नव्हते. मला खूप दुखत होतं.'




आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अनिरुद्ध देशमुख ही भूमिका अभिनेते  मिलिंद गवळी हे साकारतात. तर अरुंधती ही भूमिका अभिनेत्री मधुरणी प्रभुलकर या साकारतात. या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेतील कलाकारांनी  त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 


हे देखील वाचा-