Rujuta Deshmukh: अभिनेत्री ऋजुता देशमुखनं (Rujuta Deshmukh)  काही दिवसांपूर्वी  मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोलबाबत एक पोस्ट शेअर केली होती. तिच्या या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले होते. ऋजुतानं या पोस्टमध्ये नितीन गडकरींना (Nitin Gadkari) टॅग देखील केले होते. आता ऋजुतानं मुंबई-पुणे एक्सप्रेस वेबाबत एक नवी पोस्ट शेअर केली आहे.


ऋजुताची पोस्ट


ऋजुतानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक बस दिसत आहे. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, 'माझं आणि एक्सप्रेस वेचं नातं घनिष्ट होत चाललंय. आज आमच्या नाटकाची बस पंक्चर झाली.' ऋजुतानं तळेगाव दाभाडे येथील तिचा आणि तिच्या नाटकाच्या ग्रुपचा फोटो देखील शेअर केला आहे.




ऋजुतानं काही दिवसांपूर्वी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोलबाबत एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिनं सांगितलं, "31 जुलैला मी पुण्याला गाडी घेऊन गेले होते. आम्ही लोणावळ्यात जात असतो. खालापूरला 240 आणि तळेगावला 80 रुपये टोल घेतला जातो. पण यावेळी पुण्याला घरी पोहोचल्यावर माझ्या लक्षात आलं की 240 आणि 240 असे डिडक्ट झाले आहेत. त्यानंतर मी त्यांच्याकडे मेल करत तक्रार नोंदवली. दुसऱ्या दिवशी मी मॅनेजरसोबत बोलले घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर पहिला प्रश्न त्यांनी मला विचारला की,तुम्ही लोणावळ्यात उतरला होतात का? हो.. मी दरवेळेला लोणावळ्यात उतरत असते. त्यावर ते म्हणाले की,"आता दोन भाग झाले आहेत मुंबई ते लोणावळा 240  आणि लोणावळा ते पुणे 240 रुपये. जेव्हापासून फॅशटॅग सुरू झालं तेव्हापासूनच हे सुरू झालं आहे".  


पुढे ऋजुता म्हणाली, "फॅशटॅग सुरू झाल्यानंतरही मी अनेकदा पुणे-मुंबई प्रवास केला आहे. पण यावेळीच असं का झालं याचं त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. मुळात मुंबई ते लोणावळा हे अंतर जास्त आहे आणि लोणावळा ते पुणे हे अंतर कमी आहे. अंतर वेगवेगळं असताना अशा प्रकारचा टोल आकारणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न तिने चाहत्यांना विचारला आहे".


या व्हिडीओला ऋजुतानं कॅप्शन दिलं, तुम्हाला काय वाटतं??? अश्या अनेक गोष्टी घडतात आणि आपण किंवा मी गप्प बसते... कारण परिणाम होईल याची खात्री नसते. या वेळी मनात आलं, बोलून बघूया!!खरंच असा नियम आहे का? आणि असला तर तो बरोबर आहे का?' 


संबंधित बातम्या


Rujuta Deshmukh : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अभिनेत्रीची लूट? ऋजुता देशमुख नितीन गडकरींना टॅग करत म्हणाली,"खरंच असा नियम आहे का?"