Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचं कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या मालिकेत सध्या बरीच भावनिक गुंतागुंत पाहायला मिळत आहे. त्यामुळेच कथानक आणखी उत्कंठावर्धक झालं आहे. मात्र, इतक्या सगळ्या घडामोडी घडत असताना मालिकेत अरुंधती कुठेच दिसत नव्हती. त्यामुळे अरुंधतीने मालिका सोडली का? अशी विचारणा प्रेक्षकांकडून होत होती. मात्र, आता मालिकेत पुन्हा एकदा अरुंधतीचे कमबॅक झाले आहे.


सध्या मालिकेत मोठ्या घडमोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे अनघाचा जिन्यावरून पडून अपघात झाला आहे. तर, दुसरीकडे यशवर खुनाचा आरोप लागला आहे. आपल्या मुलांना या संकटांमधून बाहेर काढण्यासाठी अरुंधती पुन्हा एकदा देशमुखांच्या घरात परतणार आहे.


यशवर लागणार खुनाचा आरोप!


यश आणि ईशा, गौरी व मित्र-मैत्रिणींसोबत अनिरुद्धच्या मित्राच्या फार्महाऊसवर पिकनिकसाठी जातात. या फार्महाऊसवर त्यांचा अनिरुद्धच्या मित्राचा मुलगा नील देखील असतो. ईशाला पाहताच क्षणी त्याच्या मनात विकृत इच्छा जागृत होतात. कुणाचेही लक्ष नसताना तो ईशाला एका खोलीत डांबून तिच्या अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याचवेळी यश ईशाला शोधात तिथे पोहोचतो. यावेळी ईशाला वाचवताना दोघांमध्ये तुंबळ हाणामारी होते. जवळचा चाकू उचलून नील यशला मारणार, इतक्यात यश खाली पडलेला रॉड उचलून नीलच्या डोक्यात मारतो. यावेळी नील मेला असं समजून यश आणि ईशा तिथून बाहेर निघतात. ईशाला सोडून यश पुन्हा त्याच ठिकाणी येतो, तेव्हा तिथे नीलचा मृतदेह दिसत नाही. त्यामुळे तो घाबरून जातो.


यानंतर ते सगळे घरी परतात आणि घडला प्रकार घरातील लोकांना सांगतात. याचवेळी आता अरुंधतीची देखील एन्ट्री होणार आहे. आपल्या मुलांचा यात काहीच दोष नाही, असे ठणकावून सांगत ती यश आणि ईशाच्या बाजूने लढणार आहे. यात तिला अनिरुद्ध देखील साथ देणार आहे.


कुठे गायब होती ‘अरुंधती’?


मीडिया रिपोर्टनुसार ‘अरुंधती’ साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकर काही काळ ब्रेकवर होत्या. काही वैयक्तिक कारणामुळे मधुराणी यांनी सध्या सुट्टी घेतली होती. मात्र, आता त्या मालिकेत परतल्या आहेत. त्या सुट्टीवर असल्याने सध्या मालिकेचा संपूर्ण ट्रॅक अनिरुद्ध आणि संजनावर वळवण्यात आला होता. मात्र, आता अरुंधती आपलं खाजगी काम उरकून, मालिकेत पुन्हा एकदा परतल्या आहेत.


हेही वाचा :


Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’मधून ‘अरुंधती’ने घेतला ब्रेक! मालिकेत कधी परतणार?


PHOTO : नवी कोरी साडी लाखमोलाची...’संजना’ फेम रुपाली भोसलेच्या दिलकश अदा!