Khatron Ke Khiladi 12 : रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi) हा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक सीझनमध्ये प्रेक्षकांना साहसी खेळ पाहायला मिळत आहेत. आता 'खतरों के खिलाडी' हा प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचे शूटिंग पूर्ण झाले असून लवकरच छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. 


'खतरों के खिलाडी 12' चा प्रोमो आऊट


'खतरों के खिलाडी 12' हा कार्यक्रम प्रेक्षकांना 2 जुलै 2022 पासून पाहायला मिळणार आहे. कलर्स टीव्हीवर दर शनिवारी आणि रविवारी रात्री 9 वाजता प्रेक्षक हा कार्यक्रम पाहू शकतात. रोहित शेट्टी हा कार्यक्रम होस्ट करणार आहे. कलर्स टीव्हीने नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमो शेअर करत रोहित शेट्टी म्हणाला,"बच के कहां जाएगा, खतरा कहीं से भी आएगा". त्यामुळे येणार सीझन खूपच साहसी असणार आहे. 




'खतरों के खिलाडी 12'चे 'हे' आहेत स्पर्धक


'खतरों के खिलाडी'च्या 12 व्या पर्वात अनेक दिग्गज सहभागी होणार आहे. रुबीना दिलैक, सृति झा, शिवांगी जोशी, अनेरी वजानी, जन्नत जुबैर, तुषार कालिया, मोहित मलिक, निशांत भट्ट, राजीव अदतिया, कनिका मान, चेतना पांडेसारखे अनेक स्पर्धक 'खतरों के खिलाडी 12'मध्ये सहभागी होणार आहेत. हे स्पर्धक सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटीला साहसी खेळ खेळताना पाहायचे आहे. 


संबंधित बातम्या


Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवा ट्विस्ट; नेहाच्या पहिल्या नवऱ्याची होणार एन्ट्री?


Brahmastra : 'अंधेरे की रानी'; ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमातील मौनी रॉयचा अंगावर शहारे आणणारा लूक आऊट