Rochelle Rao Baby Girl: बिग बॉस 9 फेम अभिनेता किथ सिक्वेरा (Keith Sequeira) आणि 'द कपिल शर्मा शो' फेम अभिनेत्री रोशेल राव (Rochelle Rao) हे आई-बाबा झाले आहेत. रोशेलने मुलीला जन्म दिला आहे. रोशेल आणि किथ  यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन ही  आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. किथ आणि रोशेल यांनी शेअर केलेल्या पोस्टला कमेंट करुन नेटकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


किथ आणि रोशेल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे की, 1 ऑक्टोबरला रोशेलनं मुलीला जन्म दिला आहे. किथ आणि रोशेल यांनी या पोस्टला कॅप्शन दिलं, '1 ऑक्टोबर 2023 रोजी बेबी सिक्वेराचा जन्म झाला आहे. हा देवाचा आशीर्वाद आहे.तुमच्या अतूट प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद, आम्ही तुम्हा सर्वांवर प्रेम करतो.'


सुगंधा मिश्रा,सना मकबुल,सोनी राजदान यांनी किथ आणि रोशेल यांनी शेअर केलेल्या पोस्टला कमेंट करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 






काही दिवसांपूर्वी रोशेलचा बेबी शॉवर कार्यक्रम देखील पार पडला. कीथ आणि रोशेल यांनी बेबी शॉवर कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोमध्ये  रोशेल ही बेबी बंप फ्लँट करताना दिसली. 






बिग बॉस सीझन 9 मध्ये कीथ आणि रोशेलची भेट झाली होती. या शोमध्येच दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली.3 मार्च 2018 रोजी त्यांचे लग्न झाले.  रोशेलने टीव्हीवर अनेक कॉमेडी शो होस्ट केले आहेत. तिला 'द कपिल शर्मा शो'  या कार्यक्रमामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच कीथनं देखील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यानं  देखो मगर प्यार से,दिया और बाती हम,दिल ही तो है यांसारख्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Telly Masala : जितेंद्र जोशीचा 'रावसाहेब' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला ते 'बिग बॉस'चा विजेता अक्षय केळकरची 'ती' पोस्ट चर्चेत; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...