Jahnavi Killekar : बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi new season) घरात कुणी कुणाचं नसतं हे सिद्ध करत मागील आठवड्यात जान्हवी आणि निक्कीमध्येही (Nikki Tamboli) काही समज गैरसमज पाहायला मिळाले. त्यावेळी जान्हवीने (Jahnavi Killekar) केलेल्या वक्तव्याची रितेश भाऊंनी भाऊच्या धक्क्यावर पोलखोल केली. त्यानंतरही घरात सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. 


'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांचे नव्याचे नऊ दिवस संपले आहेत. दुसऱ्या आठवड्यात काही चतुर म्हणून पुढे आले तर काही फितुर म्हणून. जान्हवी किल्लेकरने हा दुसरा आठवडा चांगलाच गाजवला. रितेश भाऊने शनिवारच्या भागात तिची चांगलीच शाळा घेतली. तर आजच्या रविवारच्या भागातही तो तिचं सत्य समोर आणणार आहे. पण रितेश भाऊ जान्हवीचं सत्य समोर आणताच तिला भोवळ येते. त्यामुळे आता पुढे काय घडणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


रितेशने आणलं जान्हवीचं सत्य सगळ्यांसमोर


'बिग बॉस मराठी'च्या भाऊच्या धक्क्यावरील नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेश म्हणतोय,"जान्हवी नीट ऐका... मी जे बोलतोय ते खरं बोलतोय... लिव्हिंग एरियामध्ये तुम्ही सोफ्यावर बसला होतात रडत तेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं हे सगळं आपण करतोय आणि सगळ्या प्लॅनिंगचं क्रेडिट निक्की घेऊन जाते". रितेश भाऊने जान्हवीचं सत्य समोर आणल्यानंतर तिला भोवळ येते. आता जान्हवीचा खेळ कोणतं वळण घेणार हे पाहावे लागेल.


सगळ्याचं क्रेडिट निक्की घेऊन जाते - जान्हवी


जान्हवी इरीना आणि वैभवला सांगत असते की, हे मला आवडत नाहीये. सगळंच ते चुकीचं आणि खोटं वागताय.आपण गोष्टी करतोय आणि निक्की त्याचं क्रेडिट घेऊन जातेय. पूर्ण प्लॅनिंग माझं होतं, निक्कीच्या डोक्यातही ही गोष्ट नव्हती. त्यामुळे आता जान्हवी आणि निक्कीमध्येही वादाची पहिली ठिणगी पडणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे.  






खिलाडी कुमार वाचणार आर्याचे मेसेज?


'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात अक्षय कुमार रॅपर आर्याच्या फोनमधले मेसेज वाचणार आहे. पण आर्या मात्र अक्षयला जोरात मेसेज वाचून दाखवण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे आता खिलाडी कुमार आर्याचे मेसेज वाचणार की नाही हे जाणून घेण्यासाठी आजचा भाऊचा धक्का नक्की पाहा.


ही बातमी वाचा : 


Bigg Boss Marathi : आधी एकमेकींसाठी नडल्या, आता एकमेकींनाच भिडल्या; जान्हवी म्हणाली, 'सगळ्याच गोष्टींचं क्रेडिट निक्की घेऊन जाते...'