Rashmi Anpat: अभिनेत्री रश्मी अनपट (Rashmi Anpat) ही विविध मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. रश्मी ही सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. नुकताच रश्मीनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती शेतात काम करताना दिसत आहे. 


रश्मीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती शेतात भात लावणी करताना दिसत आहे. या व्हिडीओला रश्मीनं कॅप्शन दिलं, 'काळी माती निळं पाणी हिरवं शिवार...'. रश्मीनं शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.  


रश्मीनं शेअर केलेल्या व्हिडीओला अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी 'व्वा! खूप छान' अशी कमेंट केली आहे. तर एका नेटकऱ्यानं रश्मीच्या या व्हिडीओला कमेंट केली, 'भात लावणी खूप चांगलं प्रकारे करता रश्मी ताई' अनेकांनी रश्मीच्या या व्हिडीओला लाइक देखील केलं आहे.


पाहा व्हिडीओ: 






रश्मीनं या मालिकांमध्ये केलं काम


रश्मी ही  "शाब्बास सुनबाई" या मालिकेमधून सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. रश्मीनं असाव सुंदर स्वप्नांचा बांगला,कुलस्वामिनी, फ्रेशर्स,अवताराची गोष्टा या मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. मी, स्वरा आणि ते दोघं या रश्मीच्या नाटकाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. रश्मी ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. 






अमित खेडेकरसोबत लग्नगाठ बांधली. अमित हा अभिनेता आहे. त्यानंतर हिरकणी या चित्रपटात काम केलं आहे. अमिक आणि रश्मी अनपट यांना अभिर नावाचा एक मुलगा आहे. रश्मी आणि अमित हे अभिरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. रश्मी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिला इन्स्टाग्रामवर 268K फॉलोवर्स आहेत. रश्मी अनेक वेळा  मालिकेच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. रश्मीच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Shabbas Sunbai : प्रवाहाविरुद्ध हिंमतीने पोहणाऱ्या संजीवनीची गोष्ट; 'शाब्बास सुनबाई' प्रेक्षकांच्या भेटीला