Priya Marathe: छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. प्रिया ही  तुझेच मी गीत गात आहे  (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेत काम करत होती. पण काही दिवसांपूर्वी प्रियानं ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. प्रियाच्या मालिकांबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक असतात. जाणून घेऊयात प्रियाच्या पतीबाबत...


प्रियाचा पती शंतनू मोघे (Shantanu Moghe) हा देखील अभिनय क्षेत्रात काम करतो. शंतूननं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  2012 मध्ये शंतनू आणि प्रिया यांनी लग्न केलं. दोघेही एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. शंतनू आणि प्रिया यांच्या सोशल मीडियावरील फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते. 


शंतनू मोघेनं चित्रपट आणि मालिकांमध्ये केलं काम


स्वराज्य जननी जिजामाता आणि स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकांमध्ये शंतनू मोघेनं काम केलं. तसेच त्यानं कॅरी ऑन मराठा आणि शूर आम्ही सरदार या चित्रपटांमध्ये देखील त्यानं प्रमुख भूमिका साकारली. त्याचा रवरंभा हा चित्रपट देखील काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटामध्ये शंतनूनं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. तसेच शंतनूच्या सफरचंद या नाटकाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. 



चार दिवस सासूचे, तू तिथे मी, या सुखांनो या मराठी मालिकांमधील प्रियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. प्रियानं 'कसम से', 'पवित्र रिश्ता', 'बडे अच्छे लगते है' या हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. प्रिया ही  तुझेच मी गीत गात आहे  या मालिकेत मोनिका ही भूमिका साकारत होती. पण प्रियानं ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. प्रिया ही तिच्या अभिनयानं नेहमी प्रेक्षकांची पसंती मिळते. प्रिया ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. विविध लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. तिला इन्स्टाग्रामवर 600K फॉलोवर्स आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Tuzech Mi Geet Gaat Aahe: प्रिया मराठेनं सोडली 'तुझेच मी गीत गात आहे' मालिका; आता 'ही' अभिनेत्री साकारणार मोनिकाची भूमिका