Debina Bonnerjee, Gurmeet Choudhary : टेलिव्हीजन कपल देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) आणि गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) हे दोघे आपली मुलगी दिविशाचे जावळ करण्याकरता वाराणसीला गेले आहेत. मुलीच्या जावळानंतरचे वाराणसीतले फोटो गुरमीत चौधरीने नुकतेच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकले आहे. ज्या फोटोखाली त्यांनी कॅप्शन टाकले आहे, "भारताच्या अध्यात्मिक जागी (वाराणसी) आम्ही आमच्या मुलीचे जावळ काढले आहे. हर हर महादेव." दोघेही त्यांची पर्सनल लाईफ सोशल मिडीयावर चाहत्यांसोबत कायमच शेअर करत असतात. 6 नोव्हेंबर 2022 रोजी देबिना हिने दिविशाला जन्म दिला होता. आता दिविशा 1 वर्षाची झाली आहे. तसेच या दोघांना आणखीन एक मुलगी आहे.
'रामायण'मधील राम-सीतेच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध झालेले गुरमीत चौधरी आणि देबिना बोनर्जी आज घराघरात ओळखीचे झाले आहेत. देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांनी अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर 2011 मध्ये लग्न केले. 'रामायण'मधील राम-सीतेच्या भूमिकेमुळे त्यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. लग्नाच्या 11 वर्षानंतर, या कपलला एप्रिल 2022 मध्ये एक मुलगी झाली. जिचे नाव त्यांनी लियाना ठेवले. 6 नोव्हेंबर 2022 रोजी देबिना आणि गुरमीत दुसऱ्यांदा पालक झाले. त्यांनी त्यांच्या लहान मुलीचे नाव दिविशा ठेवले होते.
देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी जन्माच्या वेळी प्री-मॅच्युअर असल्याने त्या दोघांनी तिला प्रसिद्धीपासून लांब ठेवले होते. मात्र त्यानंतर 1 जानेवारी 2023 रोजी त्यांनी दिविशाच्या नावाबद्द्ल सर्वांना सांगितले होते. त्याच दिवशी त्या दोघांनी दिविशाचा चेहरा सोशल मिडीयाच्या माध्यामातून त्यांनी जगाला दाखवला होता. देबिना बॅनर्जीला तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीच्या वेळी खूप लोकांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. तिने दुसऱ्या प्रेग्नेंसीच्या वेळी तिच्या सोशल मिडीयावर चाहत्यांकरता एक प्रश्न उत्तराचे सेशन आयोजित केले होते. ज्यात तिला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले होते. या प्रश्नांवर तिने अगदी बेधडक उत्तरे देखील दिले होते.
देबिनाने 'रामायण', 'चिडिया घर', 'संतोषी मां', 'तेनाली रामा', 'अलादिन - नाम तो सुना होगा' आणि इतर अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले. तिने डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिये 6' मध्ये देखील भाग घेतला होता आणि लोकप्रिय स्टंट-आधारित शो 'खतरों के खिलाडी 5' मध्ये ती स्पर्धक होती. छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे देबिनाला विशेष लोकप्रियता मिळाली. तर गुरमीतने कुमकुम, पुनर्विवाह - जिंदगी मिलेगी दोबारा या मालिकांमध्ये काम केलं आहे. दोघेही एमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. देबिनाचे एक युट्यूब चॅनल देखील आहे. या चॅनलवर ती व्लॉग्स शेअर करत असते.
इतर महत्वाच्या बातम्या
Marathi Serial : 'ठरलं तर मग' की 'आई कुठे काय करते'? टीआरपीच्या शर्यतीत 'या' मालिकेने मारली बाजी