Priya Berde: “ढोलकीच्या तालावर" (Dholkichya Talavar) हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपालून छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमामध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी नुकतीच या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रिया बेर्डे या लावणी सादर करताना दिसत आहेत.
ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, कुण्या गावाचं आलं पाखरू या गाण्यावर प्रिया बेर्डे या लावणी सादर करत आहेत. प्रिया बेर्डे यांची लावणी पाहिल्यानंतर कार्यक्रमाचे परीक्षक आणि स्पर्धक धक्क झाले आहेत.
पाहा प्रोमो:
ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाचे परीक्षण अभिजीत पानसे(abhijit panse), आशिष पाटील (ashish patil) आणि क्रांती रेडकर (kranti redkar) हे करतात. या कार्यक्रमामधील स्पर्धक त्यांच्या नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतात. अक्षय केळकर हा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो.
प्रिया बेर्डे यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केलं आहे. अफलातून, अशी ही बनवाबनवी, एक गाडी बाकी अनाडी, चल धर पकड, फुल थ्री धमाल या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. तसेच त्या अनाडी आणि हम आपके है कौन या हिंदी चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. प्रिया बेर्डे या त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. लवकरच त्यांची 'सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून प्रिया बेर्डे सात वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे.
'सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची' ही मालिका 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत सिंधुताई सपकाळ यांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: