Priya Berde ON Sindhutai Mazi Mai : 'सिंधुताई माझी माई-गोष्ट चिंधीची' (Sindhutai Mazi Mai) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मातृत्वाचा झरा बनून लाखो अनाथ लेकरांची आई झालेल्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांची गोष्ट जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) सात वर्षांनी मालिकाविश्वात कमबॅक करत आहे. 


'सिंधुताई माझी माई-गोष्ट चिंधीची' या मालिकेत अभिनेत्री प्रिया बेर्डे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून प्रिया बेर्डे सात वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. त्यामुळे या मालिकेची आणि प्रिया बेर्डेंना पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या मालिकेत त्या पार्वती साठे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.






'सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची' या मालिकेत अभिनेत्री अनन्या टेकवडे चिंधीची भूमिका साकारणार आहे. तर छोट्या पडदा गाजवणारा किरण माने (Kiran Mane) या मालिकेत अभिमान साठे म्हणजेच चिंधीच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर चिंधीची आई म्हणजेच हिरु साठेच्या भूमिकेत अभिनेत्री योगिनी चौक दिसणार आहे. तसेच प्रिया बेर्डे या मालिकेत चिंधीच्या आजीच्या म्हणजेच पार्वती साठेच्या भूमिकेत दिसणार आहे. 


'सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची' मालिका कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?


'सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची' ही मालिका 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत सिंधुताई सपकाळ यांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. 
वात्सल्याचा मानबिंदू, ममतेचा झरा म्हणेज सिंधुताई. लाखो अनाथ बालकांना सिंधुताईंनी करुणेचं आभाळ दिलं... त्यांचं संगोपनचं नव्हे तर प्रत्येकाची वैचारीक जडणघडण केली. त्यांचा हा संघर्षमय प्रवास आता आपल्याला बघता येणार आहे, असं म्हणत 'सिंधुताई माझी माई-गोष्ट चिंधीची' या मालिकेचा प्रोमो आऊट करण्यात आला आहे. 15 ऑगस्टपासून संध्याकाळी सात वाजता प्रेक्षकांना ही मालिका पाहायला मिळेल.


प्रिया बेर्डेंबद्दल जाणून घ्या..


प्रिया बेर्डे या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. 'अशी ही बनवाबनवी' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. एक धागा, आम्ही तिघी या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं आहे. प्रिया बेर्डे या अभिनेत्री असण्यासोबत निर्मात्यादेखील आहेत. राजकारणातदेखील त्या अॅक्टिव्ह आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीसोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. 


संबंधित बातम्या


Sindhutai Mazi Mai: छोट्या पडद्यावर पाहता येणार सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास; “सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची” मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस, प्रोमोनं वेधलं लक्ष