Premachi Goshta Serial Update :  'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत आता सावनीच्या गौप्यस्फोटामुळे नव वळणं आले आहे. मिहिर हा सावनीचा भाऊ असल्याचे समोर आल्यानंतर मिहिर आणि मिहिकाच्या लग्नावर याचा परिणाम होणार आहे. आता सागर-मुक्तासमोर नवीन आव्हान समोर आले आहे. 


माधवीचा मिहिर-मिहिकाला नकार...


मिहिर हा सावनीचा भाऊ असल्याचे उघड झाल्यानंतर माधवी मिहिकासोबतच्या लग्नाला विरोध करते. हे नातं मला अमान्य असल्याचे माधवी सगळ्यांसमोर सांगतो. मुक्ता आणि सागर माधवीची समजूत काढण्याचे प्रयत्न करतात. हा माझ्या भावासारखा आहे. सावनी आणि त्याच्या स्वभावात खूप फरक असल्याचे सागर सांगतो. पुरुदेखील माधवीची समजूत घालण्याचे प्रयत्न करतो. इंद्रा माधवीला तुमच्या पद्धतीने लग्न करुयात असे सांगते. माधवी आपल्या निर्णयावर ठाम राहते. 


इंद्राची मुक्तावर आगपखाड


गोखले कुटुंबाच्या घरातून सगळेजण निराश मनाने परतात. घरी आल्यावर इंद्रा मुक्तावर आगपखाड करते. आमच्या मुलाला नकार द्यायला त्यात काय कमतरता होती, तुझ्या बहिणीलादेखील तिच्या गुण-दोषासह स्वीकारणार होतो ना? असे इंद्रा मुक्ताला विचारते.  बापू तिची समजूत काढत आता मिहिरला धीर देण्याची गरज असल्याचे सांगतात. 


सावनीचा संताप


सावनी घरी आल्यानंतर हर्षवर्धन साखरपुडा कसा झाला असे विचारतो. त्यावर सावनी संताप व्यक्त करत तिथे झालेला सगळा प्रकार सांगते. मिहिरने मला बहीण असल्याचेही मान्य केले नाही. मला तिथून हाकलून लावले. हे सगळे मुक्तामुळे झाले असल्याचे सावनी सांगते. 


माधवीची समजूत काढण्यासाठी प्रयत्न 


मिहिरसाठी सागरकडून माधवीची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असतात. सावनी सोबत मिहिर लहानाचा मोठा झाला आहे. तिच्यासारखे गुण त्याच्या स्वभावातही असतील असे माधवी सागरला सांगते.   माझ्या एका मुलीला त्रास होतोय, आता पुन्हा दुसऱ्या मुलीला त्रासात कशाला ढकलू असे माधवी सागरला सांगते. 


माधवीचे बाबा पुरुदेखील माधवीची समजूत काढण्याचे प्रयत्न करतात. आपण इतके दिवस त्याला पाहतोय त्याच्यामध्ये उणिवा शोधाव्यात असे काहीच सापडलेलं नाही, असे पुरू सांगतात. माधवीदेखील पुरूला उत्तर देते. कोळी  कुटुंबाला गोष्टी लपवून द्यायच्या सवयीच लागल्या असल्याचे माधवी सागरला सांगते. लग्नाआधी सागरला अकरा वर्षांचा मुलगा आहे हे आपल्याला माहित नव्हतं. ते लग्नाच्या दिवशी समजलं. जर तेव्हा मुक्ता मागे हटली असती तर मी स्वतः तिचं लग्न मोडून दिलं असते असेही माधवी म्हणते. 


मिहिरची समजूत काढणार मुक्ता...


सावनीमुळे साखरपुडा मोडल्यामुळे मिहिर प्रचंड नाराज झाला आहे. सावनीवर त्याची चिडचिड सुरू असते. मुक्ता मिहिरची समजूत काढण्याचे प्रयत्न करते. मी मिहिकासोबत लग्न करणार असल्याचे तो सांगतो. मी सावनी चा भाऊ असलो तरीही तिच्यावरून प्लीज मला जर्ज करू नका मी तिच्यासारखा मुळीच नाही हे तो सारखं मुक्ताला सांगतो. तर, मुक्ताही मिहिरला धीर देते. सावनी घरी येते तेव्हा ती एक मोठी बहीण म्हणून तुझ्याशी बोलत असल्याचे जाणवत होते असे मुक्ता सांगते. त्यावर मिहिर तिच्या बोलण्यावर जायला नको असे सांगतो. तिने फक्त सागरच नव्हे तर माझीदेखील फसवणूक केली असल्याचे मिहिर सांगतो.