Premachi Goshta Serial Update :  'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत मराठी नवीन वर्ष गुढी पाडव्याचा सण साजरा होणार आहे. मुक्ताची तब्येत बरी नाही, हे लक्षात घेऊन सागर पहाटे उठून गुढीपाडव्याची तयारी करणार आहे. या नव्या वर्षात आता सागर-मुक्ताच्या नात्यातील कडवटपणा जाऊन प्रेमाचा गोडवा येणार का, हे आता लवकरच स्पष्ट होईल. 


मुक्ताची नाराजी दूर करण्यासाठी सागरचे प्रयत्न


मुक्ताची नाराजी दूर करण्यासाठी सागरचे प्रयत्न सुरू असतात. दुसऱ्या दिवशीदेखील सागर नोकर बनून मुक्ताच्या  क्लिनिकमध्ये जातो. रात्री तुम्ही जेवला नाहीत तर सईदेखील जेवली नव्हती. आजही तुम्ही जेवला नाहीत हे कळलं तर...असे म्हणून सागर मुक्ताचा न जेवण्याचा हट्ट सोडण्यास भाग पाडतो.


सईच्या हट्टाने मुक्ता औषध घेणार, सागर करणार पाडव्याची तयारी


संध्याकाळी घरी आल्यानंतर इंद्रा मुक्ताला गुढीपाडव्याची तयारी करण्यासाठी सकाळी लवकर उठून तयारी करण्यास सांगते. मुक्ताची प्रकृती ठीक नसते. त्यावर सागर अस्वस्थ होतो. तिला औषध देण्याचा प्रयत्न करतो. पण मुक्ता औषधे घेत नाही. त्यानंतर सागर मग सईला सांगून मुक्ताला गोळी देण्यास सांगते. सईचा हट्ट पाहून मुक्ताही नरमते आणि औषध घेते.


मुक्ताची तब्येत बरी नसल्याने सागरला तिची काळजी वाटते. सईच्या मदतीने सागर मुक्ताचा फोन स्विच ऑफ करतो. मुक्ताला सकाळी उशिरा जाग येते. सकाळी 6 वाजता उठलेली मुक्ता गुढीपाडव्याची तयारी करायची असल्याचा विचार करते आणि बेडरुमच्या बाहेर पडते. तोपर्यंत सागर गुढीपाडव्याची सगळी तयारी करतो. 


सागर-मुक्तातील भांडण पुरुला समजणार?


लग्नानंतर दोघांचाही पहिला गुढीपाडवा असतो. दोघेही गुढी उभारण्यास जातात तेव्हा माधवी आणि पुरू देखील गुढीची पूजा करत असतात. मुक्ता माधवीला सागरसोबत असलेल्या भांडणाबाबत पुरूला काहीही न सांगण्याची विनंती करते. पण, पुरुला काहीतरी संशय येतो. तू काही लपवतेस का असा प्रश्न पुरू माधवीला करतो. सागर आणि मुक्तामध्ये सगळं व्यवस्थित आहे का, असा थेट प्रश्न पुरू माधवीला विचारतो. मात्र, माधवी त्याच्या प्रश्नाला उत्तर देणे टाळते. 


कोळी कुटुंबदेखील आनंदाने गुढीपाडवा साजरा करतात. मुक्ता सईला गुढी पाडव्याचे महत्त्व सांगते .