Khatron Ke Khiladi 12: दिग्दर्शक-निर्माता रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) लोकप्रिय स्टंट रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 12’ (Khatron Ke Khiladi 12) प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या रिअॅलिटी शोला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. इतर शो प्रमाणेच या शोमधून देखील दर आठवड्याला एक स्पर्धक या शोमधून एलिमिनेट होतो. नुकत्याच पार पडलेल्या एलिमिनेशन फेरीत टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या एलिमिनेशन फेरीत जन्नत जुबेर (Jannat Zubair), कनिका मान (Kanika Mann) आणि प्रतीक सहजपाल (Pratik Sehajpal) सहभागी झाले होते. मात्र, यातून प्रतीक सहजपाल स्टंट पूर्ण न करताच करून शोमधून बाहेर पडला आहे. ‘खतरों के खिलाडी 12’मधून आता प्रतीक सहजपाल बाहेर पडला आहे.
एलिमिनेशन स्टंटमध्ये तीन स्पर्धकांनी भाग घेतला होता. जन्नत जुबेर, कनिका मान आणि प्रतीक सहजपाल यांनी एकमेकांना झुंज दिली. हा स्टंट करण्यासाठी रोहित शेट्टीने सर्वप्रथम कनिका मानला बोलावले. त्यानंतर जन्नत आणि नंतर प्रतीक स्टंटसाठी पोहोचले. मात्र, स्टंट सुरू करण्यापूर्वीच प्रतीक घाबरू लागला. शेवटी, तो स्टंट सोडून या स्पर्धेतूनच बाहेर पडला. प्रतीक सहजपालची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. तो शो जिंकेल अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा होती. पण, त्याचा हा प्रवास आता इथेच थांबला आहे.
‘हे’ असू शकतात टॉप स्पर्धक
'खतरों के खिलाडी 12' च्या टॉप 3 स्पर्धकांची नावे सध्या चर्चेत आली आहेत. यामध्ये तुषार कालिया, मिस्टर फैसू आणि मोहित मलिक यांच्या नावांचा समावेश आहे. रुबीना दिलैक आणि प्रतीक सहजपाल हे स्पर्धक आधीच आऊट झाले आहेत. तर, तुषार कालिया देखील ‘खतरों के खिलाडी 12’ या शोमधून बाहेर पडला आहे. आता तुषार देखील बाहेर पडल्याने ही स्पर्धा आणखी रंगणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी मिस्टर फैसू आणि मोहित मलिक यांची नावे चर्चेत आहेत.
लवकरच जाहीर होणार विजेत्याचे नाव!
‘खतरों के खिलाडी 12’ या शोचे शूटिंग संपले आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये जवळपास 50 दिवस या शोचे शूटिंग झाले. या शोमध्ये स्पर्धक धोकादायक स्टंट करताना दिसले. 'खतरों के खिलाडी 12'च्या या सीझनलाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. रोहित शेट्टी त्याच्या खुमासदार होस्टिंगमुळे शो आणखी मनोरंजक बनवतो. यावेळी शोमध्ये रुबिना दिलैकसोबत खूप प्रँक करण्यात आले होते. तर, प्रतीक सहजपालला मात्र अनेक वेळा बोलणी ऐकावी लागली.