Khatron Ke Khiladi 12 : छोट्या पडद्यावरील खतरों के खिलाडी (Khatron Ke Khiladi 12) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. या कार्यक्रमाच्या 12 व्या सिझनचं शूटिंग हे केपटाऊनमध्ये सुरु आहे. या सिझनमध्ये अनेक सेलिब्रिटींनी सहभाग घेतला आहे. सेटवर मज्जा, मस्ती करतानाचे फोटो आणि व्हिडीओ हे सेलिब्रिटी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. रिपोर्टनुसार या सिझनचा एक टास्क करताना स्पर्धक प्रतीक सहजपालनं (Pratik Sehajpal) गेमच्या नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारा रोहित शेट्टी (Rohit Shetty) हा प्रतीकवर भडकला होता. 


खतरों के खिलाडी 12 च्या एका टास्क दरम्यान प्रतीकनं नियमांचे उल्लंघन केलं. प्रतीक आणि चेतना हा टास्क खेळणार होते. रोहित शेट्टी त्यांना गाईड करत होता. रोहितनं प्रतीकला टास्क खेळत असताना तारेचा वापर न करण्यास सांगितलं. तरी देखील प्रतीक टास्क दरम्यान तारेचा वापर करत होता. प्रतीक टास्क करत असताना रोहित त्याला तार सोडण्याचा सल्ला देत होता कारण ते सुरक्षित नव्हते आणि खेळाच्या नियमाच्या विरुद्ध होते. पण तरीही प्रतीक ती तार धरुन उभा होता. त्यानंतर रोहित प्रतीकवर भडकला. रोहित प्रतीकला म्हणाला की, जर त्यानं ती तार सोडली नाही तर तो टास्क कॅन्सल केला जाईल. 


'खतरों के खिलाडी 12 या शोमध्ये रुबीना दिलैक, मोहित मलिक, प्रतीक सहजपाल, शिवांगी जोशी या सेलिब्रिटींनी सहभाग घेतला. कोरिओग्राफर तुषार कालिया, सृती झा यांनी देखील या शोमध्ये  सहभाग घेतला आहे. 


कनिकाला झाली दुखापत
शोमधील स्पर्धक कनिका माननं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की,  खतरों के खिलाडी या शोमधील एका टास्क दरम्यान कनिकाला दुखापत झाली. ती म्हणाली,'मी तो टास्क पूर्ण केला. पण मला दुखापत झाली. मी रोहित शेट्टी सरांना सांगितलं की, मी माझा हात आणि पाय हलवू शकत नव्हाते. ते मला म्हणाले की, लोकांना तू स्ट्रॉन्ग खिलाडी आहेस ,असे वाटेल. त्यामुळे काळजी करु नको. '


हेही वाचा: