Prashant Damle : मराठी चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारे प्रशांत दामले (Prashant Damle) हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करत असतात. प्रशांत दामले हे सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांबद्दलची मतं मांडत असतात. त्यांच्या पोस्ट नेहमी चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी नाटकाच्या प्रयोगानंतर त्यांना येणारा अनुभव मांडला आहे. 


प्रशांत दामले यांची पोस्ट 
'माझी व्यथा, नाटक संपल्यानंतर तुमच्या बरोबर फोटो काढणं, तुमच्या बरोबर गप्पा मारणं, तुमच्या सूचना ऐकणं हे सगळच मी मिस करतोय. पण आपण रिस्क घेऊ शकत नाही. हा कोरोना आणि ही बंधन कधी संपतील अस झालय.सगळ पूर्ववत होऊदे बाबा लवकर' 


त्यांच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्यानं कमेंट केली, 'आम्ही सुद्धा आज नाटकाला आलो मात्र तुम्ही केलेल्या आवाहनानंतर तुम्हाला भेटायचे टाळले. आम्ही पण मिस करतो आहे तुम्हाला भेटणे.' या कमेंटला प्रशांत दामले यांनी रिप्लाय दिला, 'धन्यवाद' अनेकांनी या पोस्टला लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत. 



प्रशांत दामले यांच्या नकळत दिसले सारे, कार्टी काळजात घुसली, संगीत संशयकल्लोळ, साखर खाल्लेला माणूस आणि एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. सध्या प्रशांत दामले हे किचन कल्लाकार या कार्यक्रमाध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहेत. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha