Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : प्रसिद्ध कॉमेडी टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) गेल्या अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. इतक्या वर्षांच्या या प्रवासात अनेक पात्रांनी शोचा निरोप घेतला आणि अनेक नवीन चेहऱ्यांनी त्यांची जागा घेतली. शोमध्ये जेठालालची पत्नी बनलेल्या ‘दयाबेन’ म्हणजेच दिशा वाकाणीची जागा अद्याप कोणीही घेऊ शकलेले नाही. पण, तुम्हाला माहीत आहे का की, केवळ दिशा वाकाणी म्हणजेच दयाबेनच नाही, तर शोमध्ये आणखी एक पात्र आहे, जे अनेक वर्षांपासून शोमध्ये दिसलेले नाही.

Continues below advertisement


या लोकप्रिय मालिकेचे मुख्य पात्र ‘दयाबेन’ गेल्या 4 वर्षांपासून गायब आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण, बाघाची हार्टथ्रोब असलेली ‘बावरी’ देखील गेल्या 2 वर्षांपासून या मालिकेत दिसली नाही, हे फार कमी लोकांच्या लक्षात आले असेल. अभिनेत्री मोनिका भदौरिया 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये ‘बावरी’ची भूमिका साकारत होती.



मोनिकाने 6 वर्षे या शोमध्ये ‘बावरी’चे पात्र साकारले. परंतु, 2 वर्षांपूर्वी तिने शोला अलविदा केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोनिकाला तिची फी वाढवून हवी होती, पण जेव्हा निर्मात्यांनी तिचे ऐकले नाही तेव्हा तिने हा शो सोडला. मोनिका भदोरियाला तिचे बावरीचे पात्र खूप आवडले. आता अशी चर्चा आहे की, निर्माते अजूनही बावरीचे पात्र इतक्यात कथेत परत आणण्याच्या मूडमध्ये नाहीत. याशिवाय दिशा वाकाणीच्या भूमिकेसाठी निर्मात्यांना अद्याप एकही चांगली कलाकार सापडलेली नाही.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha