Prajaktta Mali : मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अधिक चर्चेत असते. या आधी देखील अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने राज ठाकरे यांच्या भोंग्याविषयीच्या भूमिकेवर आपले मत मांडले होते. मात्र, अगदी काहीच मिनिटांत ते एडीट करून पुन्हा दुसरे काहीतरी लिहिल्याने अभिनेत्री ट्रोल झाली होती. आताही असेच काहीसे घडले आहे. प्राजक्ता पुन्हा एकदा तिच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे.


नुकतेच प्राजक्ता माळीने स्वतःचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. या फोटोंमधील प्राजक्ता मळीचा अंदाज पाहता सगळेच तिच्या या लुकवर फिदा झाले आहेत. मात्र, हे फोटो पोस्ट करताना तिने एक अशी चूक केली, जी नेटकऱ्यांच्या लगेच लक्षात आली. यामुळेच आता ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.


पाहा पोस्ट :




नेमकं काय झालं?


मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना तिने ‘ऋतू बरवा’ या गाण्यातील ‘थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा..ऋतू हिरवा, ऋतू बरवा…’ या ओळींचे कॅप्शन दिले आहे. हे सुमधुर गाणे कवियत्री शांताबाई शेळके यांनी लिहिले आहे. या नावातच प्राजक्ताकडून चूक झाली आहे. प्राजक्ताने कवियत्रीचे नाव लिहिताना ‘शांताबाई शेळके’ऐवजी चुकून ‘शांती शेळके’ असे लिहिले. प्राजक्ताची ही चूक लक्षात येताच अनेकांनी तिला ते बदलण्यासाठीच्या कमेंट्स केल्या. बरं ही चूक लक्षात येताच तिने इन्स्टाग्रामवर नाव दुरुस्ती केली. मात्र, फेसबुकवर अजूनही कोणता बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता नेटकरी तिला जोरदार ट्रोल करू लागले आहेत.


नेटकऱ्यांनी केलं ट्रोल!


प्राजक्ताच्या या पोस्टवर सध्या कमेंट्सचा पाउस पडत आहे. अनेक चाहते तिला चूक दुरुस्त करायला सांगत आहेत. तर, काही लोक तिला या प्रकारावरून सुन्वत आहेत. ‘नाव माहित नसेल तर लिहिण्याआधी कुणाकडून तरी खात्री करून घ्यावी. चुकीचे नाव लिहून त्यांचा अवमान करू नका’, असे एका युझरने लिहिले आहे. तर दुसऱ्याने लिहिले की, ‘भोंग्याचा गोंगाट हिच्या मस्तकात ईतका भिनलाय की, सुप्रसिद्ध कवियत्रीचे नावसुद्धा विसरली.. या असल्या चुका चुकून होत नसतात. हे एक विकृत षड्यंत्र..’


हेही वाचा :