Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli :  'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात पुन्हा एकदा निक्की तांबोळीने (Nikki Tamboli) नको ते वक्तव्य वर्षा उसगावंकर (Varsha Usgaonkar) यांच्याबाबत केले. निक्कीने वर्षा उसगावंकर यांच्याशी वाद घालताना त्यांच्या मातृत्वावर प्रश्न उपस्थित केले. आपल्या चुकीची जाणीव झाल्यानंतर निक्कीने वर्षा उसगावंकर यांची माफी मागितली. मात्र, निक्कीने केलेल्या वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 


बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या आठवड्यात घरातील सदस्यांसाठी दोन छोट्या पाहुण्यांना सांभाळण्याचा टास्क दिला होता. या वेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाला. छोट्या पाहुण्यांची काळजी घेण्याच्या टास्कमध्ये या त्या पाहुण्यांचेच हाल झाले. बाळाच्या बाहुलीचे पाय तुटले,  हाल झाले. 


टास्क सुरू असताना निक्कीने समोरच्या टीमच्या सदस्यांच्या बाहुलीचा एक पाय तोडला. त्यामुळे वर्षा उसगावंकर यांनी, “निक्कीने बाहुलीची मुंडी काय, तंगडं तोडलं” असं म्हटले. यावर प्रतिउत्तर देताना निक्की म्हणते, “यांच्या भावना बघितल्या का? आईचं प्रेम कसं समजेल जाऊदेत…” निक्कीचे हे वक्तव्य ऐकताच अंकिताही संतापते आणि निक्कीला सुनावते. अंकिता म्हणते की, ''तुझं हे बोलणं अतिशय चुकीचं आहे. आताच बिग बॉस म्हणाले… हा मानवी भावनांचा खेळ आहे आणि मॅमना तू जे बोलतेय…ते सहन होणार नाही. त्यांच्या मातृत्त्वावर जाऊ नकोस. निक्की तू चुकीचं बोलतेस.” असे निक्कीला सुनावते. 


अंकिताच्या या बोलण्यावर निक्की अरेरावी करते आणि म्हणते, ''हे तू मला सांगू नकोस… या स्वत:च तंगडं तोडलं म्हणाल्या आणि मला भावनांबद्दल सांगतात.” निक्कीचा हा अरेरावीपणा पाहून वर्षा यांनी म्हटलं, “तू जे केलंय तेच मी सांगितलं… शब्द हे बाणासारखे असतात आणि ते परत घेता येत नाहीत एवढं लक्षात ठेव निक्की, एकदा बाण गेला की गेला.”  






निक्कीने मागितली माफी...


आपलं वक्तव्य चुकीचे असल्याची जाणीव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी  किचनमध्ये निक्की ही वर्षा यांची माफी मागते. तुमच्याशी कसं बोलू मला कळत नव्हतं…मला वाईट वाटत होतं. पण जे काही आईपणाबद्दल बोलली, त्यासाठी मनापासून माफी मागत असल्याचे निक्की वर्षा उसगावंकर यांना म्हणते. यावर वर्षा म्हणतात की, “तू बोललीस ते अक्षम्य आहे पण, ठीक आहे.''


नेटकऱ्यांचा संताप...


निक्कीने वर्षा उसगावंकर यांच्या मातृत्वावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर  नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. एका युजरने, वर्षा उसगावकर यांच्या मातृत्वबद्दल बोलला गेलं. त्या आई नाही होऊ शकल्या खऱ्या आयुष्यात पण live screen समोर त्याबद्दल बोलणं चुकीचं आहे अस नाही वाटत का? असा प्रश्न केला. एका युजरने संताप व्यक्त करताना म्हटले की, त्या निक्की ला कळतं का काय बोलती ती आणि ती जानव्ही दुसऱ्याची लायकी काढते हिला कोणी दिला तो अधिकार बोलायचा? असा प्रश्न केला. मानवी भावनांचा आदर टीम A कडून अजिबात केला गेला नाही. इतरांच्या खासगी आयुष्यावर बोलणे फार चुकीचे आहे, असे मत एका युजरने व्यक्त केले.