Bigg Boss Marathi Latest Update : बिग बॉस मराठीच्या घरात आता पुन्हा एकदा गणितं बदलणार आहेत. अभिजीतच्या विरोधात खेळत असल्याचं निक्कीनं स्पष्ट केलं आहे. नवीन प्रोमोमध्ये निक्की-अरबाज आणि वर्षा-अभिजीत यांच्यातील संवाद दाखवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात अरबाजने केलेल्या तमाशानंतर आता तो आणि निक्की पुन्हा एकमेकांसोबत आले आहेत. यावेळी निक्की अरबाजला स्पष्टपणे सांगते की, ती अभिजीतच्या पूर्णपणे विरोधात खेळत आहे आणि त्याला अभिजीतला काही बोलायचं असेल, तर तो बोलू शकतो. यावरुन आता बिग बॉसच्या पुन्हा खेळाला रंगत येताना दिसणार आहे.
कुणासोबत खेळायचं? अखेर निक्कीचं ठरलं
बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोमध्ये निक्की अरबाजला म्हणते की, "मी एक सदस्य म्हणून घरातल्या सदस्यांसाठी जेवण बनवेन, ती ड्युटी मला मान्य आहे. मी जेवण बनवेन आणि सर्व सदस्यांसाठी बनवेन, ते खाऊ देत किंवा नको खाऊ देत. जेवणं उरलं तर उद्या फोडणीचा भात करुन मीच खाईन. दुसरीकडे वर्षा ताई अभिजीतला म्हणत आहे की, अरबाज जो आहे, त्याच्या आपण म्हणजे तू नाही आम्ही इतके उभे राहिलो, त्याचं हेच पांग फेडायला लागलाय तो,हेच पांग फेडणार तो. यावेळी अभिजीत म्हणतो, त्याने काय बाकी ठेवलंय आणि आता त्याला तो टॅग पुसून टाकण्यासाठी तो हे करणार आहेस? यावर अभिजीत म्हणतो, म्हणजे तू एकदा चिखलात पाय टाकलेला आता दुसरा पायही तो चिखलात टाकतोय.
अरबाज की अभिजीत?
वर्षा ताई आणि अभिजीत यांचं बोलणं ऐकून शेजारील सोफ्यावर बसलेला अरबाज निक्कीला बोलतो की, अभिजीत काहीतरी बोलतोय ताईला आणि ताई काहीतरी बोलतेय त्याला, ते बोलणं ऐक. यावर निक्की म्हणते की, एक गोष्ट सांगते, तुला मी आणि अभिजीत विरोधात आहोत, त्यामुळे मी हे सांगतेय ते लक्षात ठेव. तुला त्याला काही बोलायचंय, तू बोलू शकतोस, आम्ही स्पष्टपणे एकमेकांच्या विरोधात आहोत. त्याला मी स्माईल वगैरे देत असेल ते ठीक आहे. पण, आम्ही एकमेकांच्या विरोधात आहोत. आता आम्ही एकमेकांच्या विरोधात खेळतोय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :