Bigg Boss Marathi Season 5:  ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा (Bigg Boss Marathi Season 5) सहावा आठवडा सुरू झाला आहे. महिनाभरानंतर आता बिग बॉसच्या घरातील टास्क अधिकच आव्हानात्मक होत आहे.  बिग ब़ॉसने या आठवड्यात घरातील सदस्यांना 'बीबी फार्म' हा नवा टास्क दिला. या टास्कमध्ये, मंगळवारच्या एपिसोडमध्ये वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) आणि अरबाज पटेल (Arbaz Patel) एकमेकांना नडले होते. त्यानंतर आता आजच्या एपिसोडमध्येही घरातील सदस्यांमध्ये राडा होणार आहे. 


‘बिग बॉस मराठी’च्या नव्या टास्कमध्ये सदस्यांना बीबी फार्मची जबाबदारी देण्यात आली आहे. या टास्कमधील गुणांच्या आधारे बीबी करन्सी मिळणार आहे. मंगळवारी, वैभव आणि अरबाज यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. त्याशिवाय, इतर सदस्य देखील आक्रमक झाले होते. त्यांचा हा आक्रमकपणा पाहून ‘बिग बॉस’ सदस्यांना  शिक्षा सुनावली आहे. त्यानुसार, आक्रमकतेची शिक्षा म्हणून दोन्ही टीममधील एका सदस्याला बाद करावे लागणार आहे. 


‘बिग बॉस मराठी’च्या घरात सहाव्या आठवड्याची सुरुवात झालेली आहे. पहिल्या दिवसापासून संपूर्ण घर ‘टीम A’ आणि ‘टीम B’ अशा दोन गटांमध्ये विभागलं गेलं होतं. परंतु, गेल्या आठवड्यापासून सदस्यांमध्ये असलेल्या मैत्रीचं समीकरण काहीसं बदललं आहे. आज बीबी करन्सीसाठी BB फार्ममध्ये सदस्य जोरदार राडा करताना दिसत आहेत.


'बिग बॉस मराठी'च्या आजच्या एपिसोडमध्ये सदस्य बीबी फार्ममध्ये राडा करताना दिसणार आहेत. बीबी फार्ममधून जास्तीत जास्त दूध गोळा करताना चांगलाच कल्ला करणार आहेत. कोणती टीम बीबी फार्ममधून दूध गोळा करण्यात बाजी मारेल याकडे सर्वांचं आता लक्ष लागलं आहे. या टास्कमध्ये घरातील सर्वच सदस्य जोरदार राडा करताना दिसणार आहेत. आर्या आणि निक्की यांच्यात शा‍ब्दिक चकमक होते. तर, जान्हवीदेखील टास्क जिंकण्यासाठी नडणार आहे. दुसऱ्या बाजूला सूरज चव्हाण, पॅडीदादा, डीपी आणि इतर सदस्यही टास्क जिंकण्यासाठी जोर लावणार आहेत. 






'बिग बॉस मराठी'च्या या आठवड्यात घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत हे सात स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. आता या सात जणांमध्ये घराबाहेर कोण जाणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.