Tula Japnar Ahe : 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेनंतर नीरज गोस्वामी 'तुला जपणार आहे' या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नीरज या मालिकेत अथर्वची भूमिका साकारत आहे. नीरजने आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अनेक गोष्टींना उजाळा दिला. "माझ्या भूमिकेचं नाव अथर्व आहे. अथर्वच्या भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर त्याची सध्याची मनस्थिती अशी आहे की, त्याच्या आयुष्यात एक खूप मोठं दुःख आहे.
'तुला जपणार आहे' मालिका लवकरच
अर्थवची बायको अंबिका हिचा एका अपघातामध्ये मृत्यू होतो. त्याच्याशी जोडलेला एक ओपन एंडेड प्रश्न आहे की, त्याला त्या अपघाताबद्दल 100 टक्के माहिती नाही की, तो अपघात कसा झाला. त्याला एक विचार सतत खात आहे की, त्याची मुलगी त्याच्याशी बोलत नाही, त्याच्याकडे बघतही नाही. अथर्व त्या गरजेला कसं पूर्ण करणार हा मालिकेमध्ये त्याचा प्रवास असणार आहे. या मालिकेत बरेच VFX आणि इफेक्ट वापरले जाणार आहेत, म्हणून शूट करायची पद्धत जरा वेगळी आहे.
आईची आपल्या बाळासाठी असलेल्या भावनांची गोष्ट
या भूमिकेसाठी निवड कशी झाली याचा किस्सा सांगताना नीरजने सांगितलं की, "झी मराठी टीमने मला 'सारं काही तिच्यासाठी'नंतर रिपीट करणं योग्य समजलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. माझं सिलेक्शन ऑडिशन देऊन झालं आहे. ऑडिशनला एक मोनोलॉग दिला होताआणि माझे इंटरप्रेटेशन डायरेक्टरला आवडली. मग ती ऑडिशन पुढे पाठवली गेली. झी मराठी टीम माझे नुआन्सेस, डिटेल्स नोटीस करू शकली, त्याबद्दल छान वाटलं. ही ऑडिशनची प्रोसेस होती, ज्यातून माझी निवड झाली."
"प्रोमो बघून आणि जे थोडंफार सीन्स मी करू शकलो आहे, त्यावर मी खात्री देऊ शकतो की, प्रेक्षक शर्वरी लोहकरे, ऋचा गायकवाड, प्रतीक्षा शिवणकर, सिद्धीरूपा करमरकर, संदेश उपश्याम सारख्या कलाकारांच्या प्रेमात पडतील. हे सर्व उत्तम कलाकार आणि त्यांच्या व्हर्साटिलिटीचा आनंद ऑडियन्सला घेता येणार आहे. जेव्हा प्रोमोबाहेर आला तेव्हा अनेक प्रतिक्रिया मिळाल्या. एकूणच प्रोमोचा चांगला रिस्पॉन्स आहे."
सिनेमासारखं आणि टॉप नोच पद्धतीचं शूट
नीरज पुढे म्हणाला की, मालिकेचं शूट सिनेमासारखं आणि टॉप नोच पद्धतीने केलं गेलं आहे, अशी एक सर्वांची कॉमन रिएक्शन बघायला मिळत आहे. फँटसी, फिक्शन-ड्रामा असा जॉनर असलेला हा शो आहे. खूप रिसर्च आणि मेहनत घेणारी चॅनेलची टीम आहे तर, प्रॉडक्ट हाय क्वालिटी असणार आहे आणि मला विश्वास आहे की, ऑडियन्सला हा शो नक्की आवडणार आहे. रात्री 10:30 चा स्लॉट असल्यामुळे सगळी घरची आणि ऑफिसची काम झालेली असतील, तर प्रेक्षकांना फक्त टीव्ही ऑन करून बसायचं आहे आणि मनोरंजनाचा आनंद घ्यायचा आहे.
नीरजने सांगितलं की, अभिनयाव्यतिरिक्त मला वाचायला आवडतं मग ते सिनेमांचे स्क्रिप्ट्स, स्पॅनिश बुक्स असो. माझा जॅमिंग पार्टनर असेल तर, गिटार वाजवायलाही खूप आवडतं. अधून-मधून वेळ असेल तर रात्री स्विमिंग करणं मला थेरपीसारखं आहे. मी या मालिकेमागची मेहनत आणि तयारी बघत आहे. ही मालिका बाकी मालिकांपेक्षा नक्कीच वेगळी आहे, यात शंकाच नाही. प्रेक्षकाना वेगळ्या प्रकारचं मनोरंजन देणारी ही मालिका असणार आहे.”
महत्त्वाच्या इतर बातम्या :