मुंबई : 'नवरी मिळे हिटलरला' (Navri Mile Hitlerla) मालिकेत लीला आणि एजेच्या आयुष्यात अनेक मनोरंजक किस्से घडताना दिसत आहेत. कधी ती किडनॅपच होते तर, कधी तिला केक खाण्याची शिक्षा होते. पण लीला कशी संधीच सोन करते, त्यामुळे लीलाची लीलागिरी पाहण्यात प्रेक्षक जास्त उत्सुकता असल्याचं पाहायला मिळतं. आता एजेचे उपकार फेडण्यासाठी लीला त्याच्या हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करताना पाहायला मिळणार आहे.
एजेच्या हॉटेलमध्ये लीला करणार वेटरची नोकरी
'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत सध्या लीलाच्या घरच्यांना साळुंखेने पुन्हा त्रास द्यायला सुरूवात केली आहे. राखीपौर्णिमेच्या दिवशी साळुंखे लीलाच्या घरच्यांना त्रास द्यायला पोहोचतो. साळुंखे घरात असताना एजे-लिलाच्या घरी पोहोचतो आणि तिथे एजेला साळुंखेकडून घेतलेल्या लोन बद्दल कळतं. एजे ते लोनचे पैसे भरायचं ठरवतो. पण लीला ऐनवेळी येते आणि नकार देते. रेवती एजेने तिचं रक्षण केलं म्हणून एजेंना राखी बांधण्याचं ठरवते. एजे रेवतीला ओवाळणी म्हणून 18 लाखांचा चेक देतो. एजेचं हे वागणं एकीकडे लीलाला आवडत आहे, पण दुसरीकडे तिचा स्वाभिमान ही दुखावला जात आहे.
एजेच्या हॉटेलमध्ये लीला किती काळ वेटर म्हणून टिकणार?
एजे-लीलाच नातं नवीन दिशा घेईल का?
यानंतर लीला एजेचे पैसे त्यांना परत करण्याचं ठरवते आणि वाट्टेल ते काम करायला तयार होते. लीलाची जिद्द पाहून एजे तिला आपल्या हॉटेलमध्ये काम करण्याचा सल्ला देतो. एजे, लीलाला हॉटेलमध्ये वेटरच काम करायला सांगतो. यानंतर लीला वेटर म्हणून कामाला सुरुवात करते. लीला, किती काळ एजेच्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम टिकवू शकेल? एकत्र काम करत असताना एजे-लीलाच नातं एक नवीन दिशा घेईल का? यासाठी तुम्हाला 'नवरी मिळे हिटलरला' मालिका पाहावी लागणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :