Rasika Sunil: आजपासून (26 सप्टेंबर) नवरात्रोत्सवाला (Navratri 2022) सुरुवात झाली आहे. त्यामुळे सध्या देशभरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अन् लॉकडाऊननंतर तब्बल दोन वर्षांनी पुन्हा एकदा जल्लोषात नऊ दिवस देवीची आराधना केली जाणार आहे. गरबा आणि दांडिया खेळून नवरात्रोत्सव साडरा केला जातो. वेगवेगळ्या देवीच्या गाण्यांवर लोक ताल धरतात. मराठी मलिका आणि चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री रसिका सुनीलनं देखील नुकताच गरब्याचा आनंद लुटला.  250 नेत्रहीन मुलींसोबत  रसिकानं गरब्याचा आनंद लुटला आहे. 


मराठी टेलीव्हिजन विश्वातील प्रसिद्ध चेहरा आणि महाराष्ट्राची लाडकी भूमिका असणारी शनाया म्हणजेच रसिका सुनील हिने एका वेगळ्या ढंगात नवरात्र साजरी केली. रसिकाने दादर येथील कमला मेहता अंध मुलींच्या शाळेतील मुलींसोबत काही क्षण घालवले. मुलींसोबत दांडिया रंगवण्याबरोबरच तिने तब्बल 250 अंध मुलींच्या रिंगणात गरब्यावर ताल धरला. यावेळी रसिका ही आनंदी दिसत होती. 


 



काय म्हणाली रसिका?


"लहानपणापासूनच नवरात्री साजरी करतेय, पण यंदाची नवरात्रोत्सव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. मी इतक्या सुंदर आणि बुद्धिवान मुलींच्या सानिध्यात काही क्षण घालवले. माझ्यासाठी त्या नवदुर्गा असून एक डोळस नवरात्र मी या निमित्ताने साजरी केली आहे." अशी प्रतिक्रिया तिने दिली. तिच्या या उपक्रमाचे आनेकांनी कौतुक केले आहे. 


रसिकाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती


रसिकाला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तिनं या मालिकेत शनाया ही भूमिका साकारली. पोश्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर, बस स्टॉप, गॅटमॅट, गर्लफ्रेंड या चित्रपटांमध्ये रसिकानं काम केलं आहे. रसिका ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो रसिका शेअर करत असते. 18th ऑक्टोबर 2021 रोजी रसीकानं आदित्य बिलागीसोबत लग्नगाठ बांधली.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: