Dance India Dance Super Moms: छोट्या पडद्यावरील ‘डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्स’ (Dance India Dance Super Moms) या प्रसिद्ध कार्यक्रमाच्या तिसऱ्या सिझनचा ग्रँड फिनाले काल (25 सप्टेंबर) पार पडला. हरियाणाची वर्षा बुमरा (Varsha Bumra) ही डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्सच्या तिसऱ्या सिझनची विजेती ठरली. वर्षाच्या फॉर्मन्सनं अनेकांची मनं जिंकली.
‘डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्स’ च्या तिसऱ्या सिझनचं परीक्षण रेमो डिसूजा (Remo D’Souza),अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) आणि उर्मिला मातोंडकर (Urmila Matondar) हे करत होते. तर जय भानुशाली (Jay Bhanushali) हा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होता. ग्रँड फिनालेमध्ये वर्षाला ट्रॉफीसोबतच 7.5 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. वर्षा ही वर्षा ही रोजंदारी कामगार आहे. ती दररोज 400 ते 500 रुपये कमाई करत होती. आता वर्षानं ‘डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्स’चा किताब जिंकला आह. कष्ट केले तर स्वप्न पूर्ण होतात, हे वर्षाच्या स्ट्रगल जर्नीकडे पाहिल्यावर लक्षात येते.
काय म्हणाली वर्षा
वर्षा बुमराहने 7.5 लाख रुपयांची बक्षीस रक्कम मिळाल्याबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितले, "एक लाख रुपये मिळतील, असं स्वप्न मी कधीच पाहिलं नव्हतं, त्यामुळे मी सात लाख जिंकले आहेत, ही गोष्ट मला खरी वाटतं नाहीये." वर्षाने मुलाखतीत सांगितले की, या पैशातून ती आपल्या मुलाला चांगले शिक्षण देईल.
वर्तिका झा आहे वर्षाची गुरू
वर्षा ही वर्तिका झा हिला तिची गुरू मानते. वर्तिकाचे व्हिडीओ पाहून वर्षा ही डान्स शिकत होती. त्याबद्दल तिनं सांगितलं, 'जेव्हा मी वर्तिका झा यांचे व्हिडीओ बघत होते तेव्हा मला डान्सबाबत आवड निर्माण झाली. मी त्यांचे व्हिडीओ पाहून डान्स करायला शिकले.'
पुढे मुलाखतीमध्ये वर्षा बुमराने सांगितले की, जेव्हा डीआयडीच्या मंचावर ती डान्स सादर करायला आलीतेव्हा तिला सावकारांकडून खूप त्रास सहन करावा लागला. ती म्हणाली, “जेव्हा लोकांनी मला शोमध्ये पाहिले तेव्हा ज्या सावकारांकडून आम्ही पैसे घेतले होते, त्यांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली. तेव्हा मला मी कार्यक्रमाच्या परीक्षकांना सांगावे लागले की मी लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यावेळी रेमो सरांनी मला मदत केली.'