Entertainment News Live Updates 26 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्कLast Updated: 26 Sep 2022 11:08 PM

पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय...More
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.आलिया भट्टची गगनभरारी! नेटफ्लिक्सच्या 'Heart Of Stone' सीरिजमधून हॉलिवूडमध्ये पदार्पणबॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंच आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेला चित्रपट ब्रम्हास्त्रने (Brahmastra) देखील बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. पण, आता आलियाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बॉलिवूड सिनेसृष्टीवर आपलं स्थान निर्माण केल्यानंतर आता आलिया हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. नेटफ्लिक्सच्या हार्ट ऑफ स्टोन (Heart Of Stone) या वेबसीरिजच्या माध्यमातून आलिया हॉलिवूडमध्ये दिसणार आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला आहे. बॉलिवूड ‘किंग’ शाहरुख खानचा जलवा, ‘जवान’चे शूटिंग पूर्ण होण्याआधीच चित्रपटाची बंपर कमाई!बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या 'जवान' (Jawan) या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. 2023मध्ये शाहरुख खानचे एकूण 3 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यापैकी एका चित्रपटामध्ये तो अॅक्शन अवतारात दिसणार आहे. साऊथचे चित्रपट निर्मात अॅटली याच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटात शाहरुख जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये शाहरुख एका वेगळ्या अंदाजात दिसला आहे. शाहरुख खान बऱ्याच दिवसांनी पडद्यावर परतत असून प्रत्येकजण त्याच्या चित्रपटाची वाट पाहत आहे. आता हा चित्रपट त्याच्या जबरदस्त कमाईमुळे चर्चेत आला आहे.ऑस्कर विजेत्या अभिनेत्री लुईस फ्लेचर यांचे निधन, 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासऑस्कर विजेत्या अभिनेत्री लुईस फ्लेचर (Louise Fletcher) यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. लुईस फ्लेचर यांनी त्यांच्या राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला. 1975 मध्ये मिलोस फोरमन दिग्दर्शित ‘वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट’ या चित्रपटात साकारलेल्या नर्स रॅचेडच्या भूमिकेसाठी लुईस फ्लेचर प्रसिद्ध होत्या. या चित्रपटात अभिनेते जॅक निकोल्सन यांनीही काम केले होते.फाल्गुनी पाठकच्या गाण्याचा रिमेक केल्यानंतर ट्रोल झालेल्या नेहानं शेअर केली पोस्टगायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) ही तिच्या गाण्यांमुळे चर्चेत असते. नुकत्याच रिलीज झालेल्या 'ओ सजना' या गाण्यासाठी गायिका नेहा कक्करला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. हे गाणं फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) यांच्या 'मैने पायल है छनकाई...' (Maine Payal Hai Chhankai) या गाण्याचा रिमेक आहे. फाल्गुनी पाठक यांचे 'मैने पायल है छनकाई...' हे गाणे 1999 मध्ये रिलीज झाले. या गाण्याचा रिमेक केल्यानं नेहाला नेटकरी ट्रोल करत आहेत. आता नुकतीच नेहानं एक पोस्ट शेअर करुन ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.‘छेल्लो शो’ची ऑस्करवारी वादात; चित्रपटाची निवड अयोग्य म्हणत FWICEचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र!पान नलिन (Pan Nalin) यांचा ‘छेल्लो शो’ (Chhello Show) हा चित्रपट आता वादात सापडला आहे. 2023च्या ऑस्कर नामांकनासाठी भारताकडून या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. मात्र, आता फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) या निवडीला अयोग्य म्हणत, चित्रपटाला विरोध केला आहे. यासंदर्भात फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजकडून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना एक पत्र देखील लिहिण्यात आलं आहे. FWICEने म्हटले की, हा चित्रपट भारतीय चित्रपट नाही. चित्रपटाच्या निवडीची पद्धत योग्य नसून, परीक्षकांनी त्यावर विचार केला पाहिजे.
Mahesh Manjrekar : 'त्या' गोष्टीचा त्रास माझ्या मुलांना व्हायचा : महेश मांजरेकर
महेश मांजरेकर म्हणाले आहेत,"ट्रोलर्सकडे मी लक्ष देत नाही. मी माझ्या मुलांनाही त्या कमेंट्स न वाचण्याचा सल्ला देतो. प्रत्येकाचे चाहते असतात. त्यामुळे मी जर एका स्पर्धकाला झापलं तर त्याच्या चाहत्यांना वाटणारच की मी भेदभाव करतो. पण या गोष्टीला पर्याय नाही. मी कधीच भेदभाव करत नाही. कारण माझा कोणीच आवडता स्पर्धक असा नसतो. कोण विजेता होणार हे प्रेक्षकच ठरवत असतो. त्यामुळे तो जसा चाहत्यांना आवडतो तसाच मला आवडतो".