मुंबई : 'कलर्स टीव्ही'वरील 'नागिन 2' या प्रसिद्ध मालिकेत काली नागिन 'शेषा'ची भूमिका साकारणारी अदा खान सायबर क्राईमची शिकार बनली आहे. अदाचं डेबिट कार्ड हॅक करुन चोरट्यांनी तिच्या अकाऊंटमधून दोन लाखांहून जास्त रुपये लुटले.


सुरुवातीला अदाच्या बँक अकाऊंटमधून 24 हजार रुपये काढल्याचा मेसेज आल्यावर तिला आश्चर्य वाटलं, कारण डेबिट कार्ड तिच्या बॅगमध्येच होतं. आपल्या डेबिट कार्डचा वापर करुन कोणीतरी पैसे काढत असल्याचं तिच्या लक्षात आलं. यानंतर सलग चार वेळा पैसे काढल्याचे मेसेज आले. अशाप्रकारने चोरट्यांनी तिच्या अकाऊंटमधून दोन लाखांहून जास्त रक्कम काढली.

यानंतर कॉल सेंटरमध्ये कॉल केल्यावर अदाला समजलं की, तिच्या कार्डचं क्लोन करुन कोणीतरी दुसरीच व्यक्ती ते वापरत आहे. मग तिने डेबिट कार्ड ब्लॉक केलं. "पोलिस आणि बँकेने या प्रकरणात मला फारच सहकार्य केलं," असं अदाने सांगितलं.


दरम्यान, याआधी अभिनेत्री दलजीत कौर आणि अभिनेता नकुल मेहता यांनाही सायबर क्राईमचा फटका बसला होता.