मुंबई : शहरातील जोगेश्वरी ते वांद्रे भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेचं पाणी न आल्याने नागरिक हवालदील झालेत. कवी, अभिनेते किशोर कदम यांनी या संदर्भात फेसबुक पोस्ट लिहिली आहे. मेट्रोच्या कामामुळे एक महत्वाची पाईपलाईन फुटल्याने प्रचंड प्रमाणात पाणी वाहून गेलंय. परिणामी या विभागातल्या हजारो लोकांना वेठीला धरल्या सारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे सौमित्र यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.


मेट्रोच्या कामामुळे अनेक मुंबईत अनेक ठिकाणी खोदकाम सुरू आहे. जोगेश्वरी ते वांद्रे भागात याच कामादरम्यान एक महत्वाची पाईपलाईन फुटल्याने प्रचंड प्रमाणात पाणी वाहून गेलंय. परिणामी या भागात पाणी पुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून हा पाणीपुरवठा बंद असून नागरिक विकत पाणी घेत आहे. दरम्यान, टँकरवाल्यांनी देखील टँकरचे भाव वाढवलेत. त्यामुळे सर्वसामान्यांची पाण्याअभावी मोठी अडचण निर्माण झालीय. याच संदर्भात कवी किशोर कदम यांनी फेसबुक पोस्ट लिहीली आहे. टँकर्सचे रेट्स वाढले असून बिस्लेरीचे कॅन्स किती घ्यायचे असं विचारत ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी काय करावे, असा प्रश्न देखील सौमित्र यांनी उपस्थित केला आहे.

देशातल्या पहिल्या भुयारी मेट्रो प्रकल्पाचं पंचवीसावं ब्रेक थ्रू पूर्ण; मुंबईच्या पोटात नेमकं चाललंय काय?



किशोर कदम यांची फेसबुक पोस्ट -
जोगेश्वरी ते वांद्रे या विभागात गेले तीन दिवस पाणी नसल्याने लोक हैराण झालेले आहेत. अंधेरी ईस्ट मधल्या अनेक सोसायट्यांमध्ये लोक हवालदिल झालेत. या मेट्रोच्या कामामुळे एक महत्वाची पाईपलाईन फुटली आणि प्रचंड प्रमाणात पाणी वाहून गेलं. या विभागातल्या हजारो लोकांना वेठीला धरल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कुठेही टँकर्स उपलब्ध होत नाहीयेत. त्या सगळ्यांनी त्यांचे रेट्स चौदाशे वरून पाच सहा हजारांवर नेले आहेत. मुनिसिपालिटी ऑफिसमध्ये टँकर्स साठी लोक रांगा लावून उभे आहेत आणि त्यांच्या कडून पैसे घेणं काउंटर्सवर बंद केलं थेंबभरकही लोकांच्या घरात थेंबभरही पाणी नाहीये. शेवटी बिस्लेरीचे कॅन्स किती खरेदी करणार? आणि जे विकत घेऊ शकत नाहीत त्यांचं काय? वॉर फ्रंटवर या प्रश्नाकडे या विभागातील शासकीय अधिकारी लक्ष देतील काय?

Mumbai Metro 3 | मेट्रो 3 च्या भूयारीकरणाचा 25 वा टप्पा पूर्ण | ABP Majha