Monitor Harshad Naybal : 'सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर' या कार्यक्रमातून हर्षद घराघरांत पोहोचला आहे. सुरांनी प्रेक्षकांना भुरळ घातल्यानंतर हर्षद आता 'पिंकीचा विजय असो' मालिकेत झळकणार आहे. या नव्या मालिकेत तो पिंकी या मुख्य पात्राच्या भावाची भूमिका साकारणार आहे. दिप्या असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव असून पिंकी आणि पिंकीची लहान बहिण निरीला नेहमी साथ देणारा असा हा लाडका भाऊ आहे.


मालिकेत हर्षद नायबळ वयाने लहान असला तरी तितकाच समंजस आणि वडिलांच्या मेहनतीची जाण असलेला दाखवण्यात आला आहे. स्पृहा जोशी आणि मॉनिटरच्या मस्तीने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. त्यामुळे पिंकी आणि दिप्याला भेटण्याची प्रेक्षक आता प्रतीक्षा करत आहेत. हर्षदला गाण्याची आवड तर आहेच. मात्र या मालिकेच्या निमित्ताने त्याची अभिनयाची आवडदेखील जोपासली जाणार आहे.






'पिंकीचा विजय असो' ही मॉनिटरची पहिलीच मालिका आहे. त्यामुळे तो या भूमिकेसाठी खुपच उत्सुक आहे. अल्पावधीतच मॉनिटर मालिकेच्या सेटवर सर्वांचा लाडका झाला आहे. मालिकेच्या सेटवरदेखील तो गाण्याने सर्वांचे मनोरंजन करत असतो. नव्या वर्षात हर्षदचा हा नवा अंदाज पाहायला मिळणार आहे. 'पिंकीचा विजय असो' ही मालिका 17 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


Year Ender 2021 : आर्यन खान, राज कुंद्राची अटक ते कंगना रनौतच्या ट्विटरवर बंदी... जाणून घ्या बॉलिवूडमध्ये काय घडलं या वर्षभरात


Atrangi Re : साराचा 'अतरंगी रे' सिनेमा पाहिल्यानंतर Saif Ali Khan ला अश्रू अनावर


Panghrun Movie : महेश मांजरेकरांच्या 'पांघरुण' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha