Aboli : अबोली (Aboli) या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. या मालिकेचे कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेने नुकताच 100 भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. लवकरच मालिकेत उदय टिकेकरांची धमाकेदार एन्ट्री होणार आहे.
मालिकेत सध्या अबोलीच्या आयुष्यात बरीच उलथापालथ सुरू आहे. प्रतापरावांकडून झालेल्या अपमानानंतर अंकुशने अबोलीला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे. राहायला कुठेच आसरा नसल्यामुळे अबोलीने मंदिरात राहण्याचं ठरवलं आहे. अश्यातच मालिकेत डीसीपी किरण कुलकर्णी यांची एन्ट्री होणार आहे. अबोलीला पुन्हा अंकुशच्या घरात प्रवेश मिळावा यासाठी किरण कुलकर्णी प्रयत्न करतील का हे पहाणं उत्सुकतेचं असेल.
अभिनेते उदय टिकेकर किरण कुलकर्णी हे पात्र साकारणार आहेत. या पात्रविषयी उदय टिकेकर म्हणाले,"किरण कुलकर्णी हे पात्र अतिशय संवेदनशील आणि प्रेमळ आहे. त्याच्या येण्याने मालिकेत नेमकं काय घडणार याचा उलगडा होईलच पण हे पात्र प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा आहे".
संबंधित बातम्या
Band Bajaa Varaat : 'बँड बाजा वरात' म्हणजे प्री-वेडिंग धमाल : पुष्कराज चिरपुटकर
Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेत नवा ट्विस्ट, इंद्रा-दीपूच्या प्रेमाबद्दल सानिकाला कळणार?
Majhi Tujhi Reshimgath : बाबा म्हणून स्वीकार करायला परी घेणार यशचा इंटरव्ह्यू, होळीच्या रंगात रंगणार यश-नेहाचं प्रेम?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha