Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Marathi Serials Ashadhi Ekadashi : 'ठरलं तर मग' ते 'रंग माझा वेगळा'; मराठी मालिकांमध्ये रंगणार आषाढी एकादशी विशेष भाग


Marathi Serials Ashadhi Ekadashi : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या वेगवेगळे प्रयोग होत आहेत. आपली मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी आणि मालिकेचा टीआरपी वाढावा यासाठी निर्माते आणि लेखक वेगवेगळे प्रयोग करत आहेत. आता आषाढी एकादशी निमित्त मराठी मालिकांचे विशेष भाग रंगणार आहेत. 





Prashant Damle : प्रशांत दामलेंच्या सुखी संसाराचं रहस्य काय? पहिल्याच भेटीत पडले होते प्रेमात


Prashant Damle Love Story : प्रशांत दामले (Prashant Damle) हे मराठी रंगभूमीवरील बहुरुपी अभिनेते आहेत. आजवर त्याने अनेक नाटकं, मालिका, सिनेमे आणि जाहिरातींमध्ये काम केलं आहे. रंगभूमीवर वेगवेगळ्या भूमिका साकारणारे प्रशांत दामले पहिल्याच भेटीत गौरी दामले (Gauri Damle) यांच्या प्रेमात पडले होते. प्रशांत दामले यांच्या आयुष्यात पत्नी गौरी दामले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 





Suchitra Bandekar: 'दार उघड बये दार उघड म्हणणारा आदेश...'; सुचित्रा बांदेकर यांचा खास उखाणा, व्हिडीओ व्हायरल



Suchitra Bandekar: अभिनेत्री सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) या चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. सुचित्रा या सध्या त्यांच्या 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva)  या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत.  'बाईपण भारी देवा' या  चित्रपटाच्या एका प्रमोशन इव्हेंटमध्ये सुचित्र बांदेकर यांना उखाणा घेण्याचा आग्रह प्रेक्षकांनी केला. त्यानंतर सुचित्रा यांनी घेतलेल्या उखाण्यानं अनेकांचे लक्ष वेधले. 






Samir Choughule: खळखळून हसवणाऱ्या समीर चौघुलेबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?


Samir Choughule: अभिनेता समीर चौघुले (Samir Choughule) हा गेल्या काही दिवसांपासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. समीरनं अनेक चित्रपट आणि कार्यक्रमामध्ये काम केले. समीर हा त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतो.  अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये समीर चौघुलेनं त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं होतं. जाणून घेऊयात समीरच्या बालपणाबद्दल तसेच त्याच्या पहिल्या नाटकाबद्दल...


Lokmanya : 'लोकमान्य' मालिका महत्त्वाच्या टप्प्यावर; टिळक आणि आगरकर यांच्यातील मतभेदाला सुरुवात


Lokmanya Marathi Serial Latest Update : 'लोकमान्य' (Lokmanya) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेच्या माध्यमातून टिळकांचा जाज्वल्या देशभिमान पाहायला मिळत आहे. राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाच्या घटना आणि प्रसंग या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण आता ही मालिका एका महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. मालिकेत आता लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) आणि गोपाळ गणेश आगरकर (Gopal Ganesh Agarkar) यांच्यातील मतभेदाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे.