Milind Gawali: अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांना आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत त्यांनी अनिरुद्ध ही भूमिका साकारली.  मिलिंद हे वेगवेगळ्या विषयांवर आधारित पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतीच मिलिंद गवळी यांनी  त्यांच्या लेकीच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. 


मिलिंद गवळी यांची पोस्ट


मिलिंद गवळी यांनी  त्यांची मुलगी मिथिलाच्या बालपणीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं,  'वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मिथिलाचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी दिवाळी दसऱ्यापेक्षा मोठा सण, तीन जून तारीख म्हणजे आमच्या आयुष्यातला मोठा क्षण,काही दिवस येतात आपल्या आयुष्यामध्ये जे आपलं आयुष्यच बदलून टाकतात, जीवन सुंदर वाटायला लागतं , जगायला एक कारण मिळतं, परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होतो आणि एक छोटीशी परी तुमच्या घरी येते, आणि घरातलं वातावरणच सगळं बदलून जातात, सगळ्यांची सगळी काम बाजूला राहतात सगळ्यांचे सगळे महत्वाचे गोष्टी बाजूला ठेवल्या जातात आणि फक्त त्या एका जीवाच्या आजूबाजूला तुमचं जीवन सुरू होतं, तशीच आमच्या आयुष्यामध्ये मिथिला रूपाने एक सुंदरशी परी घरी आली. ती हसली की घरातले सगळे हसायचे ,ती रडली की सगळ्यांचे डोळे पाणावायचे , तिला झोप आली की मग सगळ्यांची झोपायची वेळ व्हायची , तिच्या अवतीभवती आमचं जग फिरायचं, आणि सगळ्यात जास्ती आजी आजोबांचं जग ती होती. '






पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'आजी आजोबांमुळे तिच्यावर खूप सुंदर संस्कार झाले. असं म्हणतात की खूप भाग्यवान असतात ते आई वडील ज्यांच्या घरी मुली जन्माला येतात, खरंच आम्ही मागच्या जन्मी काहीतरी खूप मोठ पुण्य केलं असेल म्हणून आम्हाला मिथिला झाली.'


मिलिंद गवळी यांनी या पोस्टच्या माध्यमातून मिथिलाच्या बालपणीच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी मिथिलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 


मिलिंद गवळी यांनी पालखी, आधार आणि वैभव लक्ष्मी या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत असतात. आई कुठे काय करते मालिकेमधील त्यांच्या अनिरुद्ध या भूमिकेला विशेष लोकप्रियता मिळाली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Milind Gawali: 'एका बापाची व्यथा...' ; आई कुठे काय करते मालिकेमधील अनिरुद्धच्या पोस्टनं वेधलं लक्ष