Rhea Chakraborty: अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) ही गेल्या 'रोडीज-19' (Roadies) या शोमधून गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'रोडीज' च्या 19 व्या सीझनमध्ये गँग लीडरची भूमिका रिया चक्रवर्ती साकारते. सध्या रोडीज या शोमधील रियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रिया ही ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसत आहे.
रोडीज या शोमधील रियाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रिया ही रोडीजच्या ऑडिशनला आलेल्या एका मुलीला ट्रोलर्सकडे लक्ष न देण्याचा सल्ला देत आहे. ती म्हणते, 'माझ्याबद्दल अनेकांनी अनेक वाईट गोष्टी बोलल्या आहेत. मलाही लोकांनी अनेक लेबल दिली आहेत. पण मी ते लेबल्स स्विकारणार नाही. त्यांच्यामुळे मी माझ्या आयुष्यात अजिबात थांबणार नाही. तू त्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस' रियाच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. अनेक नेटकऱ्यांनी रियाच्या या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.
रिया चक्रवर्तीने जेव्हा रोडीज या शोमध्ये भाग घेतला तेव्हा सोशल मीडियावर अनेकांनी या कार्यक्रमाचा विरोध केला. शोच्या चाहत्यांनी यावर आक्षेप नोंदवले. त्याचवेळी शोमध्ये प्रिन्स नरुला आणि रिया यांच्यात अनेकदा वाद झाले आहेत.
रोडीज या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. रोडीजचा सध्या 19 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिझनमध्ये रियासोबतच गौतम गुलाटी आणि प्रिंस नरूला हे देखील गँग लिडरची भूमिका साकारत आहे.
2020मध्ये सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रियावर काही आरोप करण्यात आले होते. त्यावेळी अनेकांनी रियाला ट्रोल केले होते. रिया ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
रियाने 2012 मध्ये आलेल्या ‘तुनिगा तुनिगा’ या तेलगू चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटाच्या अवघ्या एका वर्षानंतर म्हणजेच 2013मध्ये 'मेरे डॅड की मारुती' या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. रियानं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिनं ‘सोनाली केबल’, ‘दोबारा’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘बँक चोर’, ‘चेहरे’ आणि ‘जलेबी’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :