Mika Singh On Shaan : मिका सिंहचा (Mika Singh) 'स्वयंवर मीका दी वोटी' (Swayamvar Mika Di Vohti) हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अल्पावधीतच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 'स्वयंवर मिका दी वोटी'च्या पहिल्या भागात प्रेक्षकांना मिका आणि शानची (Shaan) मैत्री जाणून घेता आली. मिका आणि शान दोघे चांगले मित्र आहे. 


'स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमात मिका म्हणाला,"शानची आई माझ्यावर मुलाप्रमाणेच प्रेम करायची. मला शानची पत्नी राधिकासारखी पत्नी माझ्या आयुष्यात हवी असल्याने शानची आई माझ्यासाठी मुलीदेखील बघत होती". शान आणि मीकाची खूप घट्ट मैत्री आहे. मीकाच्या 'स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन धुरा शानच सांभाळणार आहे. तसेच योग्य जोडीदार शोधण्यासाठी मिकाची मदतदेखील करणार आहे. 






नुकत्याच एका मुलाखतीत मिका म्हणाला,"माझ्या नावामुळे आणि लोकप्रियतेमुळे जर कोणी मुलगी माझ्यासोबत लग्न करण्यास उत्सुक असेल तर मला काहीच अडचण नाही. 'स्वयंवर मीका दी वोटी' या कार्यक्रमात सहभागी होणारी प्रत्येक मुलगी माझ्यासोबत लग्न करण्यास उत्सुक आहे".


12 मुलींमधून मिका करणार एकीची निवड


स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमात 12 मुली सहभागी होणार आहेत. 45 वर्षीय मिका सिंह 12 मुलींमधून एकीची प्रेयसी म्हणून निवड करणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील विविध कानाकोपऱ्यातून मुली आल्या होत्या. 12 मुलींमधून मिका जोडीदार म्हणून कोणाची निवड करणार हे पाहणं मनोरंजक असणार आहे. 


संबंधित बातम्या


Swayamvar Mika Di Vohti : मिका सिंहचे जोधपूरमध्ये होणार स्वयंवर; 19 जूनपासून कार्यक्रमाला सुरुवात


Swayamvar Mika Di Vohti : मिकाच्या स्वयंवरात कृष्णा थिरकला 'सामी-सामी' गाण्यावर; 'मिका दी वोटी' चा धमाकेदार एपिसोड