Mi Honar Superstar Jallosh Juniorscha: ‘मी होणार सुपरस्टार - जल्लोष ज्युनियर्सचा’ (Mi Honar Superstar Jallosh Juniorscha) या कार्यक्रमामध्ये बच्चे कंपनी हे विविध परफॉर्मन्स सादर करतात. त्यांचे हे परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटी देखील हजेरी लावतात. सध्या या कार्यक्रमामधील एका परफॉर्म्सचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये ज्ञानदा आणि  कॅप्टन वैभव घुगे (Vaibhav Ghuge) यांच्या परफॉर्मन्सची झलक दिसत आहे.


ज्ञानदा आणि वैभव यांनी त्यांच्या परफॉर्मन्समधून भक्त प्रल्हादाची कथा प्रेक्षकांसमोर मांडली आहे. त्यांचा परफॉर्मन्स पाहून कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रेक्षक थक्क होतात, असं प्रोमोमध्ये दिसत आहे. ज्ञानदा आणि वैभव यांचा हा परफॉर्मन्स प्रेक्षक आज रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार - जल्लोष ज्युनियर्सचा’ या कार्यक्रमात पाहू शकतात.  तसेच मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री  जुई गडकरी देखील  एक खास परफॉर्मन्स करणार आहे.


पाहा प्रोमो: 



मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमाला प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळत आहे. बच्चेकंपनीचे दमदार परफॉर्मन्सेस, कोरिओग्राफर फुलवा खामकर (Phulwa Khamkar),  वैभव घुगे यांचं (Vaibhav Ghuge) मार्गदर्शन आणि  सुपरजज अंकुश चौधरीचा (Ankush Choudhary) सळसळता उत्साह यामुळे या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. छोट्या दोस्तांचे असेच नवनवे परफॉर्मन्स पहाण्यासाठी न चुकता पाहा मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा.



मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमाच्या गेल्या एपिसोडमध्ये  खानदेशच्या प्रथम बोरसे याने नृत्यातून अंकुश चौधरी याचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवास प्रेक्षकांसमोर मांडला होता. प्रथमचा हा परफॉर्मन्स पाहून  अंकुश चौधरी (Ankush Choudhary) भावूक झाला. प्रथमने सादर केलेल्या परफॉर्मन्सच्या निमित्ताने अंकुशच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mi Honar Superstar Jallosh Juniorscha: ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’मध्ये प्रथम बोरसेचा परफॉर्मन्स पाहू अंकुश चौधरी झाला भावूक; पाहा व्हिडीओ