Anupamaa 5 Year Leap: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) यांच्या ‘अनुपमा’ (Anupamaa) या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. अनुपमा मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. या मालिकेमध्ये अनेक वेळा ट्वीस्ट येत असतात. लवकरच या मालिकेत पाच वर्षांचा लीप होणार आहे. या लीपमुळे मालिकेच्या कथानकामध्ये रंजक वळण येणार आहे.
'अनुपमा' या मालिकेमध्ये पाच वर्षांची लीप होणार आहे, ज्यामुळे केवळ अनुपमाचेच नाही तर अनुजचेही आयुष्य बदलून जाईल. अनुपमा आणि अनुज वेगळे राहतात. माया, वनराज आणि बरखा यांनी मिळून अनुपमा आणि अनुज यांना वेगळं केलं आहे. अशा परिस्थितीत, 5 वर्षांच्या लीपनंतर अनुज आणि अनुपमा यांच्या आयुष्यात काय बदल होणार आहेत? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
'या' अभिनेत्रीची होणार एक्झिट?
'अनुपमा' ही तिच्या घरामध्ये डान्स अॅकॅडमीची सुरु करते. 5 वर्षांच्या लीपनंतर अनुपमा ही मोठी बिजनेसवुमन होईल, असा अंदाज लावला जात आहे. तर दुसरीकडे अनुज हा अनु आणि मायासोबत खुश असेल. शोमधून एका अभिनेत्रीची एक्झिट होईल असं म्हटलं जात आहे, ही अभिनेत्री छोटी अनु असेल, असा अंदाज लावला जात आहे. मालिकेतील पाच वर्षांच्या लीपनंतर अनु ही भूमिका साकारणारी अस्मी देव ही मालिका सोडेल, असं म्हटलं जात आहे. आता अनुपमा मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
अनुपमा मालिकेची स्टार कास्ट
अनुपमा या मालिकेमध्ये अभिनेत्री रुपाली गांगुली या अनुपमा ही भूमिका साकरतात. तर अभिनेता गौरव खन्ना हा अनुज ही भूमिका साकारतो. अभिनेत्री मदालसा शर्मा ही काव्या ही भूमिका साकारते. या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेतील रुपाली यांच्या कामाचे अनेकांनी कौतुक केलं.
'अनुपमा' या मालिकेचा प्रीमियर 13 जुलै 2020 रोजी झाला होता. गेली तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. रोमेश कालरा हे या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. या मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते.
इतर महत्वाच्या बातम्या:
Rupali Ganguly : साध्याभोळ्या ‘अनुपमा’चा ग्लॅमरस अवतार, पाहा रुपाली गांगुलीचं नवं फोटोशूट