Appi Aamchi Collector : 'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Aamchi Collector) ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. अप्पीची मेहनत फळास आली आहे. मालिकेच्या आगामी भागात अप्पी कलेक्टर झालेली पाहायला मिळणार आहे. अप्पीने बापूंच्या रिक्षातून अभ्यास केला होता. मेहनतीच्या जोरावर अप्पी कलेक्टर आसगावात तिचं जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.
अप्पी कलेक्टर झाल्याने बापूंचा आनंद गगणात मावेना!
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अप्पीचे वडील अर्थात बापू त्यांच्या रिक्षासोबत अर्थात राणीसोबत संवाद साधताना दिसत आहेत. बापू राणीला सांगत आहेत,"राणी ऐकलंस का... आपली अप्पी कलेक्टर झाली. खरंतर ती माझी दुसरी लेक पण पहिली लेक तू आहेस.. लक्षात ठेव".
बापू पुढे म्हणत आहेत,"अप्पीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहताना माझ्याबरोबर हाताला हात देत तू उभी राहिली. त्यामुळे शक्य झालं. अप्पीने तुझ्यात बसून अभ्यास केला आहे. अप्पीला अभ्यास करताना तू पाहिलं आहेस. तिचं यश पाहिलं आहेस. माझ्या लेकीने खूप मेहनत घेतली, अभ्यास केला. आज ती कलेक्टर झाली आहे फक्त तुझ्यामुळे. आज अप्पीसाठीच नाही आपल्यासाठीपण अभिमानाची गोष्ट आहे...आज पेढे वाटत सर्वांना सांगायचं अप्पी आमची कलेक्टर".
आसगावात अप्पीचं जल्लोषात स्वागत...
अप्पी कलेक्टर झाल्यावर आसगाव तिचं जल्लोष स्वागत करण्यात येणार आहे. अप्पीच्या यशाबद्दल गावकरी तिचं कौतुक करताना दिसणार आहे. कलेक्टर होण्यासाठी अप्पी घेत असलेले कष्ट गावकऱ्यांनी जवळून पाहिले आहेत. त्यामुळे अप्पीचा निकाल लागल्यानंतर आसगावात तिची मिरवणूक काढण्यात येणार आहे. अप्पी कलेक्टर झाल्यामुळे बापू संपूर्ण गावात पेढे वाटणार आहेत. गावात अप्पीच्या नावाची खास रांगोळीदेखील काढण्यात येणार आहे.
महाएपिसोडची चाहत्यांना उत्सुकता (Appi Aamchi Collector Special Episode)
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेच्या महाएपिसोडची सर्वांना उत्सुकता लागली आहे. 16 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर या मालिकेचा महाएपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या विशेष भागात अप्पी कलेक्टर झालेली दिसून येईल.
संबंधित बातम्या