Mi Honar Superstar Jallosh Juniorscha: मराठी चित्रपटसृष्टीती प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Choudhary) हा त्याच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकतो. अंकुशनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चाळीतील सांस्कृतिक कार्यक्रमांमधून अभिनयाचा श्रीगणेशा करत अंकुशने नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली. म्हणता म्हणता प्रेक्षकांचा अंकुश हा लाडका अभिनेता सुपरस्टार झाला. अंकुशचा  प्रेरणादायी प्रवास ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’च्या (Mi Honar Superstar Jallosh Juniorscha) बच्चेकंपनीने आपल्या नृत्यातून सादर केला. 


खानदेशच्या प्रथम बोरसे याने नृत्यातून साकारलेला आपला जीवनपट पाहून अंकुश चौधरी भावूक झाला. प्रथमने सादर केलेल्या परफॉर्मन्सच्या निमित्ताने अंकुशच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. हा खास परफॉर्मन्स या आठवड्यात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.  






मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमाला प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळतेय. बच्चेकंपनीचे दमदार परफॉर्मन्सेस, फुलवा खामकर आणि वैभव घुगे यांचं मार्गदर्शन आणि  सुपरजज अंकुश चौधरीचा सळसळता उत्साह यामुळे या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. छोट्या दोस्तांचे असेच नवनवे परफॉर्मन्स पहाण्यासाठी न चुकता पाहा मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा.


अंकुश चौधरीचा आगामी चित्रपट


अंकुश हा महाराष्ट्र शाहीर या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अंकुशनं या चित्रपटात  शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अंकुशसोबतच अतुल काळे, अमित डोलावत, सना केदार शिंदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. अजय-अतुल यांनी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटामधील गाण्यांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.  धुराळा, दगडी चाळ-2,दुनियादारी, लालबाग परळ, क्लासमेट्स, डबल सीट यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये अंकुशनं काम केलं आहे. तसेच त्यानं  आभाळमाया,बेधुंद मनाच्या लहरी  या मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. अंकुशच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. त्यानं  जिस देश मे गंगा रहता है या हिंदी चित्रपटामध्ये काम केलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Shahir Tailer: 'कलाकाराला चेहऱ्यावरील दु:ख रंगाच्या आड दडवावं लागतं'; ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज